HDFC Bank netbanking services Sakal
Personal Finance

HDFC Bank: ग्राहकांसाठी मोठी बातमी! HDFC बँकेची ऑनलाइन सेवा 2 दिवस राहणार बंद; काय आहे कारण?

राहुल शेळके

HDFC Bank: तुम्हीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आठवड्याच्या शेवटी बँकेने एक मोठी अपडेट दिली आहे. बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे कळवले आहे की HDFC बँकेच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग सेवा 2 दिवस काम करणार नाहीत.

बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसनुसार, एचडीएफसी बँक नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग ॲपवरील काही व्यवहार 9 जून आणि 16 जून रोजी काम करणार नाहीत. बँक ग्राहक 9 जून रोजी पहाटे 3:30 ते 6:30 पर्यंत या सेवा वापरू शकणार नाहीत. तर 16 जून रोजी पहाटे 3:30 ते 7:30 या वेळेत या सेवांच्या वापरावर बंदी असेल.

बँकेच्या वेबसाइटनुसार, खाते उघडणे, ठेवी, निधी हस्तांतरण (NEFT, IMPS, RTGS आणि बँक हस्तांतरण), ऑनलाइन पेमेंट यांसारखे काही व्यवहार 9 आणि 16 जून 2024 रोजी सकाळी 03:30 ते 06:30 या वेळेत बंद असणार आहेत. या कालावधीत HDFC बँकेचे ग्राहक UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाहीत.

यापूर्वी बँकेने म्हटले होते की ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी ते सिस्टम अपग्रेड करत आहे. यामुळे HDFC बँकेच्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड सेवांमध्ये सुधारणा होईल. यासाठी दोन दिवस कार्डशी संबंधित सेवा प्रभावित होणार आहेत.

4 जून रोजी सकाळी 12.30 ते 2.30 या वेळेत डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डसाठी सिस्टम अपग्रेडचे वेळापत्रक निश्चित केले होते. यामुळे तुम्हाला एटीएममधून पैसे काढता आले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT