High Court orders tax refund of over rs 1,128 crore to Vodafone Idea  Sakal
Personal Finance

Income Tax: व्होडाफोन-आयडियाला मिळणार 1,128 कोटींचा रिफंड; मुंबई उच्च न्यायालयाने दिला आदेश, काय आहे प्रकरण?

Vodafone Idea Income Tax Case: खंडपीठाने दोन वर्षांनी हा निर्णय दिला आहे.

राहुल शेळके

Vodafone Idea Income Tax Case: उच्च न्यायालयाने आयकर प्राधिकरणाला व्होडाफोन आयडियाने कर म्हणून भरलेले 1,128 कोटी रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम व्याजासह भरावी लागणार आहे. न्यायमूर्ती के.आर. यांच्या खंडपीठाने दोन वर्षांनी हा निर्णय दिला आहे.

व्होडाफोन आयडियाच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. व्याजासह परतावा देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.

खंडपीठाने केस एफएओला त्याच्या हलगर्जीपणाबद्दल फटकारले आहे. यासोबतच कायद्यानुसार कर्तव्ये न बजावणाऱ्या FAO विरोधात चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. या प्रकरणात सरकारी तिजोरीचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

या आदेशाची प्रत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आणि भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना पाठवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

अशा परिस्थितीत कलम 144 C मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. या अंतर्गत, FAO ला 30 दिवसांच्या आत अंतिम आदेश जारी करण्याची तरतूद आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

न्यायमूर्ती केआर श्रीराम आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, फेसलेस असेसिंग ऑफिसर (FAO) ने 31 ऑगस्ट 2023 रोजी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करता येणार नाही.

कारण FAO ने पॅनेलच्या सूचना जारी केल्यानंतर 30 दिवसांऐवजी दोन वर्षांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. यासाठी खंडपीठाने केस एफएओला फटकारले आहे. यासोबतच एफएओविरोधात चौकशीची शिफारस करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT