Hindenburg 2: 24 जानेवारी 2023 चा तो दिवस कदाचित अदानी समूह कधीच विसरू शकणार नाही. हा तो दिवस होता जेव्हा अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाविरुद्ध अहवाल आणून खळबळ उडवून दिली होती.
या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सची इतकी वाईट अवस्था झाली की अदानी समूहाने कल्पनाही केली नसेल. आता तब्बल 8 महिन्यांनंतर हिंडनबर्ग पुन्हा एकदा असाच भूकंप करु शकतो. मात्र, यावेळी अदानी समूह त्याचा बळी ठरणार नाही. आता इतर भारतीय कंपन्यांवर हिंडनबर्गचा अहवाल येईल.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट देशातील काही औद्योगिक घराण्यांबद्दल अहवाल उघड करू शकतो. ही संस्था जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड यांसारख्या संस्थांद्वारे चालवली जाते.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार ही संस्था लवकरच भारतातील मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांबाबत अहवाल जारी करू शकते. कंपनीचा तपास अहवाल अंतिम टप्प्यात आहे.
सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, ही संस्था अहवालांची संपूर्ण मालिका प्रसिद्ध करेल. यामध्ये भारतीय कंपन्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नसला तरी यात भारतातील बडे दिग्गज असू शकतात असे मानले जात आहे.
जॉर्ज सोरोस कोण आहेत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉर्ज सोरोस हे मोदी सरकारचे विरोधक मानले जातात. खरे तर जॉर्ज सोरोस यांनी मोदी सरकारवर अनेकदा टीका केली आहे. या संस्थेचे जाळे आशिया, युरोप, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत पसरलेले आहे. या अहवालावर काम करणाऱ्या इतरांना रॉकफेलर ब्रदर्स आणि फोर्ड फाऊंडेशनकडून निधी मिळतो.
हिंडेनबर्गच्या अहवालाचा फटका अदानी समूहाला सहन करावा लागला. या प्रकरणात अदानींच्या आघाडीच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. या प्रकरणात अदानी समूहाबरोबरच एलआयसीचेही नाव समोर येत होते.
LIC ची अदानी समूहात मोठी गुंतवणूक होती. त्यामुळे देशातील कोट्यवधी जनतेचे पैसे एलआयसीमध्ये बुडणार नाहीत, असे वाटत आहे. हे प्रकरण अजूनही सुरू आहे. सेबी अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.