Hindenburg Research on SEBI: हिंडेनबर्ग संशोधन अहवालात केलेले आरोप काही प्रमाणात सेबीच्या प्रमुखांनी मान्य केले आहेत. असे हिंडेनबर्गचे मत आहे. हिंडेनबर्ग संशोधन अहवालात शनिवारी रात्री सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्याविरुद्ध खळबळजनक खुलासे करण्यात आले असून, त्यांच्यासोबत त्यांच्या पतीचा अदानी घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अदानी समूहाच्या अहवालावर सेबीने कारवाई केली नाही, कारण सेबी प्रमुखाची अदानीशी संबंधित संस्थांमध्ये गुंतवणूक असल्याचे थेट अहवालात म्हणले आहे.
अमेरिकन शॉर्टसेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन अहवालातील खुलाशांवर सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी दिलेल्या विधानांवर हिंडेनबर्ग यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या नवीन अहवालात आरोप केला आहे की माधबी आणि धवल बुच यांच्याकडे दोन परदेशी फंडांमध्ये म्हणजेच ऑफशोअर फंडांमध्ये स्टेक आहेत, ज्याचा वापर करून अदानी ग्रुपमध्ये पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे.
हिंडेनबर्गने पुढे सांगितले की, सेबीला अदानी समूहाशी जोडलेल्या गुंतवणूक निधीची चौकशी करण्याचे काम सोपविण्यात आले होते, ज्यामध्ये बुच यांनी स्वत: गुंतवणूक केलेल्या निधीचा समावेश असू शकतो.
असाही आरोप आहे की जेव्हा माधबी बुच या SEBI च्या पूर्णवेळ सदस्य होत्या, तेव्हा 2019 मध्ये, त्यांचे पती धवल बुच यांना ब्लॅकस्टोन कंपनीचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्याच ब्लॅकस्टोनला SEBI ने REIT नियमांमध्ये केलेल्या मोठ्या बदलांचा फायदा झाला.
हिंडेनबर्गने सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचे विधान सोशल मीडिया पोस्टसोबत जोडले आहे.
दीड वर्षांपूर्वी जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्गने अदानी समूहावर अहवाल प्रसिद्ध करून देशांतर्गत शेअर बाजारात खळबळ उडवून दिली होती. आणि त्यानंतर अनेक महिने अदानी समूहाचे शेअर्स घसरत राहिले.
हिंडेनबर्गने दीड वर्षांपूर्वी अदानी समूहाविरोधात जो अहवाल आणला होता. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे, अदानी समूहाचे शेअर्स 83 टक्क्यांनी घसरले आणि समूहाचे मार्केट कॅप 80 अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमी झाले. शेअर बाजार नियामक सेबीने तपासानंतर अदानी समूहाला सर्व आरोपांपासून मुक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.