SEBI Chairperson Madhabi Buch: शेअर बाजार नियामक सेबीने त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील अकाउंट हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर लॉक केल्याचे आरोप युजर्सकडून करण्यात येत आहेत. तर काही युजर्सच्या म्हणण्यानुसार सेबीचे एक्स अकाउंट 2020 पासून लॉक असल्याचा दावा करत आहेत.
दरम्यान माजी अर्थमंत्री पी. दिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी X वर सेबीच्या लॉक केलेल्या अकाउंटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले आहे की, "एखादी सार्वजनिक संस्था हे कसे करू शकते?"
एक्सवर जर एखादे अकाउंट लॉक असले तर त्यांच्या पोस्ट काही निवडक फॉलोअर्सच पाहू शकतात. याचा अर्थ असा की, जोपर्यंत सेबी एखाद्याची फॉलो रिक्वेस्ट स्वीकारत नाही किंवा त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत कोणताही युजर सेबीच्या पोस्ट पाहू शकत नाही.
काल हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर अनेकांनी SEBI च्या X अकाउंटला भेट दिली. तेव्हा या युजर्सना एक मेसेज दिसत आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, "या पोस्ट सुरक्षित आहेत. @SEBI_India मधील पोस्ट फक्त मंजूर फॉलोअर्स पाहू शकतात."
अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या नव्या अहवालात धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालात भारतीय शेअर बाजार नियामक सेबीच्या प्रमुख आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
या अहवालानंतर, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) प्रमुख माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची नावे कथित अदानी घोटाळ्याशी जोडली जात आहेत.
शनिवारी रात्री उशिरा आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये आरोप करण्यात आला की, या जोडप्याने अदानींनी गैरव्यवहाराच्या कथित घोटाळ्यात वापरल्या जाणाऱ्या ऑफशोअर फंडांमध्ये भागीदारी केली आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी यांनी अस्पष्ट ऑफशोअर बर्म्युडा आणि मॉरिशस फंडांवर नियंत्रण ठेवल्याचा आरोप केला होता आणि त्यांचा वापर निधीचा गैरवापर करण्यासाठी आणि शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी केला गेला, असे म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.