Narayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताची कार्यसंस्कृती बदलण्याची गरज असून देशाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याची तयारी ठेवावी, असे म्हटले होते.
पॉडकास्ट “द रेकॉर्ड” वर मोहनदास पै यांच्या मुलाखतीत मूर्ती म्हणाले की, भारताला उत्पादकता सुधारण्याची गरज आहे. नारायण मूर्ती यांच्या या विधानावर सोशल मीडियावर वाद चालू आहे.
इतरांना 70 तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वतः किती तास काम करायचे? ते जाणून घेऊया. इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी अवघ्या 10,000 रुपयांमध्ये इन्फोसिस सुरू केली होती.
नारायण मूर्ती सकाळी 6.20 वाजता कार्यालयात पोहोचायचे
एका मुलाखतीत नारायण मूर्ती यांनी खुलासा केला होता की ते सकाळी 6.20 वाजता इन्फोसिस कॅम्पसमध्ये पोहोचायचे. आणि रात्री 9 वाजेपर्यंत कार्यालयात काम करायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दिनक्रमामुळे त्यांना ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली.
ऑफिसमध्ये येणार्या कर्मचाऱ्यांना ते वेळेवर पोहोचण्यासाठी प्रवृत्त करत असे. ऑफिसमध्ये एवढा वेळ देऊन कुटुंबाला वेळ कसा देता आला, असे विचारले असता. ते म्हणाले की, व्यवसाय करणे सोपे नाही, हे एक धाडसाचे काम आहे आणि त्यात त्याग करावा लागतो.
सज्जन जिंदाल यांचे नारायण मूर्तींना समर्थन
नारायण मूर्ती यांचे समर्थन करत जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले की, 70 तास काम करणे हे समर्पणाशी संबंधित आहे. आपल्याला 2047 मध्ये भारताला अशी आर्थिक महासत्ता बनवायची आहे ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटेल.
ते म्हणाले की, वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला 5 दिवसांच्या कार्यसंस्कृतीची गरज नाही. ते म्हणाले की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज 14-16 तासांपेक्षा जास्त काम करतात. माझे वडील आठवड्याचे सात दिवस, दिवसाचे 12 ते 14 तास काम करायचे. मी दररोज 10 ते 12 तास काम करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.