HUDCO signs MoU with Rajasthan Govt 400 percent strong return in one year Sakal
Personal Finance

HUDCO चा राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करार, एका वर्षात 400% दमदार परतावा...

सकाळ वृत्तसेवा

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेच्या(HUDCO) शेअर्समध्ये नुकतीच 5 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. बीएसईवर हा शेअर दोन टक्क्यांच्या वाढीसह 313.30 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीने राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जोरदार खरेदी पाहायला मिळाली. या वाढीसह, कंपनीचे मार्केट कॅप 62,719 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 353.95 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 60.80 रुपये आहे. गेल्या एका वर्षात स्टॉकने 400 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे.

HUDCO ने 24 जुलैला स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की त्यांनी राज्यातील गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी राजस्थान सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे.

कंपनीने म्हटले आहे की हा सामंजस्य करार राज्यातील गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी पुढील 5 वर्षांमध्ये 1,00,000 कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी दोन्ही पक्षांमधील इन-प्रिंसिपल अरेंजमेंट आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर कंपनीचे सीएमडी संजय कुलश्रेष्ठ आणि राजस्थान वित्त (अर्थसंकल्प) विभागाचे सचिव देबाशीष प्रुस्ती यांनी स्वाक्षरी केल्याचे हुडकोने स्टॉक एक्सचेंजला सांगितले.

अलीकडेच, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (AMFI) HUDCO ला 'मिडकॅप' स्टॉक म्हणून वर्गीकृत केले आहे, तर आधी 'स्मॉलकॅप' म्हणून वर्गीकृत केले होते. वर्गीकरणातील हा बदल ऑगस्टपासून लागू होणार आहे.

मिडकॅप वर्गीकरण मर्यादा AMFI ने 27600 कोटी केली आहे. 24 जुलै 2024 पर्यंत HUDCO चे मार्केट कॅप 62,719.53 कोटी आहे. HUDCO ने परवडणारी घरे आणि झोपडपट्टी पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करून भारतातील अनेक गृहनिर्माण आणि शहरी विकास प्रकल्पांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT