ICICI Bank SmartLock Sakal
Personal Finance

ICICI Bank: आयसीआयसीआय बँकेने करोडो ग्राहकांसाठी सुरू केली नवीन सेवा; आता तुमचे खाते राहणार सुरक्षित

ICICI Bank SmartLock: तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला आता इंटरनेट, क्रेडिट आणि डेबिट कार्ड सेवा लॉक आणि अनलॉक करता येणार आहेत. ICICI बँकेने 'स्मार्टलॉक' लाँच केले आहे.

राहुल शेळके

ICICI Bank SmartLock: तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला आता इंटरनेट, क्रेडिट आणि डेबिट कार्ड सेवा लॉक आणि अनलॉक करता येणार आहेत. ICICI बँकेने 'स्मार्टलॉक' हे फीचर लाँच केले आहे. ज्याद्वारे ग्राहक बँकिंग सेवा त्वरित लॉक आणि अनलॉक करू शकतात. ग्राहक ही सेवा फोन किंवा ई-मेलद्वारे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हच्या मदतीशिवाय करू शकतात. स्मार्टलॉकद्वारे अनेक बँकिंग सेवा लॉक आणि अनलॉक करता येणार आहेत.

iMobile Pay ॲप ग्राहकांना लॉक आणि अनलॉक करण्यास मदत करेल. हे ग्राहकांना एका बटणाच्या क्लिकवर इंटरनेट बँकिंग, UPI (बँक खात्याशी जोडलेल्या इतर UPI ॲप्सवरून पेमेंट), क्रेडिट आणि डेबिट कार्डचा प्रवेश लॉक/अनलॉक करण्यास मदत करेल.

ग्राहक विशिष्ट कालावधीत विशिष्ट बँकिंग सेवा सक्रिय आणि निष्क्रिय करण्यासाठी या सेवेचा वापर करू शकतात. हे फीचर फसव्या व्यवहारांच्या संरक्षणासाठी देखील वापरता येणार आहे.

स्मार्टलॉकबद्दल सिद्धार्थ मिश्रा, प्रमुख, डिजिटल चॅनल्स आणि भागीदारी, आयसीआयसीआय बँकेने सांगितले की, 'स्मार्टलॉक' लाँच करणे हा ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी बँकेचा एक प्रयत्न आहे.

'स्मार्टलॉक' सेवा कशी वापरायची:

स्टेप 1: iMobile Pay मध्ये लॉग इन करा.

स्टेप 2: होम स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात 'स्मार्टलॉक' वर क्लिक करा.

स्टेप 3: तुम्हाला लॉक/अनलॉक करायचे असलेल्या प्रमुख बँकिंग सेवांवर क्लिक करा.

स्टेप 4: व्हेरिफाय करण्यासाठी स्वाइप करा

'iMobile Pay' वापरणे सुरू करण्यासाठी, कोणत्याही बँकेतील ग्राहक त्यांचे बँक खाते ॲपशी लिंक करू शकतात, UPI ID जनरेट करू शकतात आणि व्यवहार सुरू करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT