income tax notice Esakal
Personal Finance

Income Tax विभागाच्या नोटीसला लगेच उत्तर न देणं पडू शकतं महागात

Income tax notice: आयकर विभागाकडून जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नासंबधी किंवा टॅक्स संबंधित काही प्रश्न विचारण्यात आल्यास किंवा तुम्हाला नोटीस मिळाल्यास दिलेल्या कालावधीत त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे

Kirti Wadkar

income tax notice: ITR फाईल करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. अनेकजणांनी टॅक्स वाचवण्यासाठी विविध प्रकारची गुंतवणूक किंवा सेव्हिंग नमूद ITR मध्ये नमूद केली असतील. Ignoring Income Tax department notice may lead you in trouble

अर्थात तुम्ही भरलेल्या ITR मध्ये इन्कम टॅक्स विभागाला Income Tax Department काही शंका आल्यास प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला नोटीस पाठवली जाऊ शकते. या नोटिसकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

कारण आयकर खात्याकडून आलेल्या नोटिसकडे किंवा विचारण्यात आलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

आयकर विभागाकडून जर तुम्हाला तुमच्या उत्पन्नासंबधी Income किंवा टॅक्स संबंधित काही प्रश्न विचारण्यात आल्यास किंवा तुम्हाला नोटीस मिळाल्यास दिलेल्या कालावधीत त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. जर तुम्ही नोटीसला योग्य वेळेत उत्तर दिलं नाही तर तुमची ITR फाईल संपूर्ण तपासणीसाठी पाठवली जाऊ शकते.

सर्च वॉरंट जारी केलं जाऊ शकतं

अशा बाबतीत तुम्ही आयकर विभागाच्या कचाट्यात सापडल्यास तुमच्या समस्या अधिक वाढू शकतात. तुम्हाला अधिक प्रश्न विचारले जाऊ शकता. तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांची सखोल चौकशी केली जाऊ शकते.

तसचं उत्पन्नाची चुकीची माहिती देणं, टॅक्स चोरी किंवा काळ्या पैशाची फेरफार अशा विविध पैलूंचा विचार करून तुमची चौकशी केली जाऊ शकते. एवढचं नव्हे तर नोटीसला योग्य वेळेत उत्तर न दिल्यास तुमच्या विरोधात सर्च वॉरंट जारी केलं जाऊ शकतं.

हे देखिल वाचा-

Central Board of Direct Taxes (CBDT) ने ITR ची संपूर्ण चौकशीसाठी नियमावली जारी केलीय. ही नियमावली केवळ चालू वित्तिय वर्ष २०२३-२४साठी लागू आहे. या गाइडलाइन्सनुसार आयकर विभागाने जिथं करचोरी किंवा कर चुकवेगिरीसाठी नोटीसा पाठवल्या होत्या तिथं इन्कम टॅक्स रिटर्नची चौकशी होणं गरजेचं आहे.

ज्या व्यक्तीच्या उप्तन्नाच्या स्त्रोतांमध्ये आयकर विभागाला गडबड वाटते. तसंच जर करदात्याने उत्पन्नाबाबत चुकीची माहिती पुरवली असेल किंवा काळ्या पैशांचा घोटाळा केला असेल अशाच करदात्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाते.

आयकर विभागाच्या नोटीसला उत्तर देणं गरजेचं

एखाद्या व्यक्तीच्या ITR बद्दल आयकर विभागाला संशय निर्माण झाल्यास नोटीस बजावली जाते किंवा काही प्रश्न विचारले जातात. यावेळी उत्तर देण्यासाठी ठराविक अवधी दिला जातो. या अवधीच्या आत जर करदात्याने समाधानकारक उत्तर दिलं तर ते प्रकरणं तिथंच संपतं. मात्र योग्य वेळेत आणि समाधानकारक उत्तर न दिल्यास आयकर खात्याकडून पुढील कारवाई केली जाते.

यासाठी आयकर विभागाच्या प्रश्नांची योग्य वेळेत उत्तरं देणं गरजेचं आहे. काही वेळेस उत्पन्नामध्ये काही चुक असल्यास पेनल्टी भरून ती सुधारली जाऊ शकते. मात्र, प्रश्नांकडे आणि नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई होवू शकते. ज्यामध्ये तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो किंवा तुमची एखादी मालमत्ता जप्त देखील होवू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT