Indian Wedding Industry Sakal
Personal Finance

Wedding Cost: भारतात शिक्षणापेक्षा विवाह सोहळ्यांवर सर्वात जास्त खर्च; एका लग्नात होतोय तब्बल एवढ्या लाखांचा चुराडा

Indian Wedding Industry: भारतात लग्नांची एक वेगळीच क्रेझ आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यापासून ते दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या विवाहसोहळ्यांपर्यंत भारतीय विवाहसोहळा नेहमीच भव्यदिव्य साजरा केला जातो.

राहुल शेळके

Indian Wedding Industry: भारतात लग्नांची एक वेगळीच क्रेझ आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यापासून ते दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली, प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या विवाहसोहळ्यांपर्यंत भारतीय विवाहसोहळा नेहमीच भव्यदिव्य साजरा केला जातो.

जेफरीजच्या अलीकडील अहवालानुसार, 'बिग फॅट इंडियन वेडिंग'वर दरवर्षी सुमारे 10 लाख कोटी रुपये (130 अब्ज डॉलर) खर्च केले जातात, अमेरिकेमध्ये सुमारे 70 अब्ज डॉलर खर्च केला जातो. तर चीनमध्ये 170 अब्ज डॉलर पेक्षा कमी खर्च केला जातो.

जेफरीजच्या मते, सध्या प्रति लग्न सरासरी खर्च सुमारे 12.50 लाख रुपये आहे. जेफरीजने नोंदवल्याप्रमाणे, सरासरी भारतीय जोडपे शिक्षणापेक्षा विवाहावर सुमारे 2 पट जास्त खर्च करतात (पूर्व प्राथमिक ते पदवीपर्यंत).

जेफरीजच्या मते, खर्चाच्या दृष्टीकोनातून, लग्नाच्या खर्चात सर्वात मोठा हिस्सा दागिन्यांचा आहे. ज्वेलरी मार्केटमध्ये 50 टक्के ते 55 टक्के दागिने लग्नासाठी असतात, त्यानंतर 35 टक्के रोजच्या पोशाखांसाठी आणि 20 टक्के फॅशनसाठी असतात.

जेफरीजच्या अहवालात सांगितले की, भारतात होणाऱ्या प्रत्येक लग्नावर सुमारे 12.5 लाख रुपये खर्च केले जातात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा आकडा भारताच्या दरडोई जीडीपीच्या जवळपास 5 पट आहे, जो 2.4 लाख रुपये आहे. त्याच वेळी, हा खर्च वार्षिक घरगुती उत्पन्नाच्या 3 पट आहे. विशेष म्हणजे भारतातील लोक इतर अनेक देशांच्या तुलनेत लग्नावर सर्वाधिक खर्च करतात.

देशात लक्झरी लग्नाची किंमत 20-30 लाख रुपये आहे. हॉटेल, खानपान, सजावट आणि मनोरंजनावर सर्वाधिक पैसा खर्च होतो. यामध्ये दागिने, कपडे आणि प्रवासाचे भाडे समाविष्ट नाही.

लग्नसोहळ्यात सर्वात जास्त पैसा कोण कमावत?

  • प्रत्येक लग्नात सर्वात जास्त खर्च दागिन्यांवर होतो. सराफा उद्योग लग्नाच्या हंगामात सर्वाधिक 35-40 टक्के कमाई करतो.

  • यानंतर केटरिंग उद्योग येतो, ज्याला 24-26 टक्के महसूल मिळतो.

  • कार्यक्रम नियोजन उद्योगाला 18-20 टक्के

  • फोटोग्राफर 10-12 टक्के

  • वस्त्रोद्योगासाठी 9-10 टक्के

  • डेकोरेशन उद्योगालाही 9-10 टक्के वाटा मिळतो

  • याशिवाय इतर उद्योगांना 20 ते 25 टक्के महसूल मिळतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT