Donation Tax Deduction: प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० जी’ अंतर्गत धर्मादाय किंवा स्वयंसेवी संस्थांना देणगी देऊन परमार्थाबरोबरच प्राप्तिकर सवलतीचाही लाभ घेता येतो. हे सर्वांनाच माहित आहे. मात्र आता ही सवलत घेण्यासाठी विवरणपत्र भरताना देणगी प्रमाणपत्राची माहिती देणे अनिवार्य आहे; तसेच आता फक्त जुनी करप्रणाली निवडलेल्या व्यक्तींनाच मिळू शकते.
आर्थिक वर्ष २०२०-२१ पर्यंत कोणीही व्यक्ती प्राप्तिकर विवरणपत्र भरताना देणगी पावतीच्या आधारे ‘कलम ८० जी’ खाली करसवलत मिळवू शकत असे. परंतु, आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून प्राप्तिकर विवरणपत्रात देणगी प्रमाणपत्राची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
प्राप्तिकर पोर्टलवरील प्रमाणपत्र ग्राह्य
‘वित्त कायदा २०२०’ मधील सुधारित ‘कलम ८० जी’नुसार देणगी स्वीकारणारी निर्दिष्ट, धर्मादाय संस्था किंवा स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांनी प्राप्तिकर पोर्टलवरून घेतलेले प्रमाणपत्र हेच देणगी मिळाल्याचा आणि प्राप्तिकर सवलत पात्रतेचा पुरावा समजले जाईल.
अशाप्रकारे या संस्थांना प्राप्तिकर विभागाला आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून देणगी मिळाल्याचे वार्षिक विवरणपत्र जमा करणे अनिवार्य केले आहे. (Latest Marathi News)
या संस्थांनी वेगळे प्रमाणपत्र देणगीदारांना दिल्यानंतरच देणगीदार करसवलतीसाठी दावा करू शकतो. धर्मादाय संस्थांना मिळालेल्या देणग्या आणि करदात्यांनी दावा केलेली प्राप्तिकर सवलत यांचा ताळमेळ घालण्याची व्यवस्था प्राप्तिकर विभागाने केली असून, या सवलतीचा गैरफायदा घेता येणार नाही, याची खात्री केली आहे.
प्रिन्सीपल प्राप्तिकर कमिशनर मान्यताप्राप्त अशी देणगी स्वीकारणाऱ्या संस्थांना प्राप्तिकर खात्याच्या ई-फायलींग पोर्टलद्वारे अर्ज ‘१० बीडी’मध्ये मागील आर्थिक वर्षाचे देणगी विवरणपत्र ३१ मेपर्यंत भरावे लागते. हे देणगी विवरणपत्र फाईल केल्यानंतर देणगीदारांना सर्टिफिकेट ई-फायलींग पोर्टलमधून डाउनलोड करून देता येते.
महत्त्वाचे मुद्दे
देणगी देण्यापूर्वी संस्था प्राप्तिकर खात्याच्या पात्र संस्थांच्या अद्ययावत यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करणे.
करसवलतीची श्रेणी तसच सवलतीची रक्कम, पात्रता मर्यादा तपासणे पात्र संस्थेने फॉर्म ‘१० बीडी’मध्ये देणगी विवरणपत्र दाखल केल्यानंतर संस्थेकडून ‘फॉर्म १० बीई’ देणगी पावती घेणे
प्राप्तिकर विवरणपत्रात ‘कलम ८० जी’ मध्ये देणगी संदर्भ क्रमांक (एआरएन) नोंद करणे.
(लेखक बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.