प्राप्तिकर कायद्यात सुधारणा sakal
Personal Finance

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक बदल

प्राप्तिकर कायद्यात सुधारणा केल्या जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या काही काळापासून करप्रणाली सुटसुटीत होण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे करदात्यांना फायदा झाला आहे. अलिकडेच ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारा एक महत्त्वाची सुधारणा प्राप्तिकर कायद्यात करण्यात आली आहे. प्राप्तिकर कायद्यात ‘कलम १९४ पी’ समाविष्ट करण्यात आले असून, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची विवरणपत्र भरण्याच्या किचकट प्रक्रियेतून सुटका झाली आहे. हा फार महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल आहे.

कलम १९४ पी

‘कलम १३९’ प्रमाणे प्रत्येक नागरिकाला प्राप्तिकर कायद्याखाली विवरणपत्र भरावे लागते. मात्र, आर्थिक वर्ष २०२१च्या अर्थसंकल्पात ‘प्राप्तिकर कायदा १९६१’ मध्ये ‘कलम १९४ पी’ समाविष्ट करण्यात आले आणि त्याअंतर्गत ७५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकाला विवरणपत्र भरण्यापासून सवलत देण्यात आली. यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

ज्येष्ठ नागरिकाचे वय ७५ वर्षे किंवा त्याहून जास्त असावे.

ज्येष्ठ नागरिक मागील आर्थिक वर्षात भारतीय नागरिक असला पाहिजे.

ज्या बँकेतून त्याला पेन्शन व व्याजाचे उत्पन्न मिळते. त्याबाबत त्याने डिक्लरेशन दिले असणे आवश्‍यक आहे.

‘टीडीएस’ कापण्याची जबाबदारी त्या बँकेकडे असेल (६-अ आणि ८७-अ अंतर्गत काही वजावट घेतल्यानंतर )

बँकेने ‘टीडीएस’ कापून घेतला, की त्या नागरिकाला विवरणपत्र भरावे लागणार नाही

डिक्लरेशनमधील बाबी

ज्येष्ठ नागरिकाचे पूर्ण उत्पन्न

‘कलम ८० सी’ ते ‘८० यू’ खाली घेतलेल्या वजावटी

‘८७ अ’ खाली घेतलेली सूट

हे उत्पन्न पेन्शन आणि व्याजातून आलेले आहे याची पुष्टी बँकेला देणे. ‘१२ बीबीए’ हा फॉर्म भरून डिक्लरेशन देता येते. त्यानंतर बँक पेन्शन आणि व्याज याची बेरीज करून करयोग्य उत्पन्न मांडते. सर्व वजावटी गृहीत धरून ‘टीडीएस ’कापते.

जुन्या प्राप्तिकर योजनेप्रमाणे बँकेला वजावटी, सवलती याचा पुरावा सादर करावा लागतो; मात्र नव्या करप्रणालीप्रमाणे गुंतवणुकीचे पुरावे द्यावे लागत नाहीत. हा नव्या करप्रणालीचा फायदा आहे.

(लेखिका ज्येष्ठ करसल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT