Budget 2024 Sakal
Personal Finance

Budget 2024: नोकरदार खुश! अर्थमंत्र्यांनी केला टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल.. करमर्यादा 75000 रुपयांपर्यंत वाढली

Union Budget 2024 Income Tax Slab by FM Nirmala Sitharaman: मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदार वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. कर स्लॅबमध्ये बदल करण्याच्या मध्यमवर्गाच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला सरकारने दिलासा दिला आहे.

राहुल शेळके

Budget 2024 Income Tax Slab: मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदार वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. कर स्लॅबमध्ये बदल करण्याच्या मध्यमवर्गाच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला सरकारने दिलासा दिला आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सरकारकडून नवीन कर प्रणाली सुलभ केली जात आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की दोन तृतीयांश करदाते नवीन कर प्रणाली अंतर्गत आले आहेत. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75000 रुपये करण्यात आली आहे.

टॅक्स स्लॅबमध्येही बदल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर संदर्भात मोठी घोषणा केली आहे. स्टँडर्ड डिडक्शनसोबतच टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवीन कर स्लॅब दरात हा बदल झाला आहे. आता 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 30 टक्के कर लागू होणार आहे.

बदल कधी झाले?

भाजप सरकारने 2018 च्या अर्थसंकल्पात स्टँडर्ड डिडक्शन वाढवून 40,000 रुपये वार्षिक केले होते. यानंतर, 2019 च्या अंतरिम बजेटमध्ये, स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा प्रति वर्ष 50,000 रुपये करण्यात आली. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आता ती वाढवून 75000 करण्यात आली आहे.

नवीन कर प्रणालीतील कर दराची रचना अशी असेल...

- शून्य ते 3 लाखांपर्यंत कर नाही.

- 3 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत 5% कर.

- 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत 10% कर.

- 10 लाख ते रु. 12 लाखांपर्यंत 15% कर.

- 12 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंत 20% कर.

- 15 लाख रुपयांच्या वर 30% कर दर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT