Income Tax Return: How to save tax? Sakal
Personal Finance

IT Return 2023: जास्त कर भरताय? आयकर कायद्यात कर वाचवण्याचे आहेत मार्ग, कोणते ते जाणून घ्या

राहुल शेळके

Income Tax Deductions Provisions Available For Tax Payers Income Tax Return Updates :

आर्थिक वर्ष 2023 साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. आता रिटर्न भरण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. हे पाहता आयकर विभाग करदात्यांना लवकरात लवकर रिटर्न भरण्याचे आवाहन करत आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चे अध्यक्ष नितीन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत चार कोटींहून अधिक प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरले गेले आहेत आणि त्यापैकी सुमारे सात टक्के नवीन किंवा प्रथमच रिटर्न आहेत.

बरेचदा असे दिसून येते की लोक शेवटच्या क्षणी घाईत रिटर्न भरतात त्यामुळे ते प्राप्तिकर विभागाने दिलेल्या कपातीचा लाभ घेऊ शकत नाहीत.

80C व्यतिरिक्त कर बचत

आयकर कायदा 1961 अंतर्गत विविध कर सवलतींच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला करदात्यांचे दायित्व कमी करण्यात मदत होऊ शकते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ दिला जातो, जो अनेकदा लोकांना माहीत असतो.

प्राप्तिकर कायद्याच्या विविध कलमांतर्गत आणखी अनेक वजावट मार्ग आहेत ज्यांचा लाभ तुम्ही तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी घेऊ शकता. आयटीआर 2023 भरताना करदाता सहा कपातीचा दावा करू शकतो. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. (how to save tax?)

1. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये गुंतवणूक

करदात्यांना नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच NPS मध्ये गुंतवणूक करून 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट मिळू शकते. NPS मधील गुंतवणूक कलम 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत वजावटीसाठी पात्र आहे. हे 80C अंतर्गत उपलब्ध 1.5 लाख रुपयांच्या व्यतिरिक्त असेल.

2. बचत खात्यातून मिळणारे व्याज

आयकर कायद्याच्या कलम 80TTA मुळे करदात्यांना बचत खात्यातून मिळणारे वार्षिक 10,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करते.

3. शैक्षणिक कर्जावरील व्याजासाठी वजावट

कलम 80E अंतर्गत, तुम्ही शैक्षणिक कर्जावर भरलेल्या व्याजावर आयकर सवलत देखील मागू शकता. करदाते त्यांच्या मुलांसाठी किंवा ज्यांचे ते कायदेशीर पालक आहेत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर हा लाभ घेऊ शकतात. ही वजावट तुम्ही कर्जाची परतफेड सुरू केल्यापासून आठ वर्षांच्या कालावधीसाठी घेता येते.

4. देणगीसाठी वजावट

केंद्र सरकारद्वारे निधीसाठी केलेल्या देणग्या पूर्ण कपातीसाठी दावा केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही पंतप्रधान मदत निधी, मुख्यमंत्री मदत निधी इत्यादींना देणगी दिल्यास, तुम्ही 100% कपातीचा दावा करू शकता. इतर प्रकरणांमध्ये तुम्ही 50% पर्यंत कपातीसाठी पात्र आहात.

5. आरोग्य तपासणी

कलम 80D अंतर्गत, स्वत:च्या, अवलंबित मुलांसाठी, जोडीदारासाठी किंवा 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पालकांच्या आरोग्य तपासणीवर 5,000 रुपयांपर्यंतची कर सूट मिळू शकते. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पालकांसाठी, 7,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

6. LIC, PPF वजावट

दिल्लीस्थित गुंतवणूक आणि कर तज्ञ आशुतोष रंजन यांच्या मते, पालक त्यांच्या मुलांसाठी आयटीआर भरताना एलआयसी आणि पीपीएफ कपातीच्या बदल्यात कर सवलतीचा दावा करू शकतात.

नोंद: आयटीआर फाइलिंगमध्ये कोणतीही अडचण आल्यास, आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या युजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध माहितीची मदत घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT