income tax department ai support taxpayers be alert itr revenue ais article 133c Sakal
Personal Finance

पगारदारांनो, सावधान!

प्राप्तिकर विभागाचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर’ (एआय) करदात्यांना ई-मेल नोटिस पाठवून माहितीतील विसंगती दूर करण्याबाबत सतर्क करत आहे.

डॉ. दिलीप सातभाई dvsatbhaiandco@gmail.com

प्राप्तिकर विभागाने म्हैसूरमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये एक विशेष स्वतंत्र विभाग कार्यान्वित केला आहे. या विभागाचे मुख्य कार्य करदात्याने प्राप्तिकर विवरणपत्रात नोंदविलेली उत्पन्नाची आकडेवारी आणि या विभागाकडे उपलब्ध असलेली करदात्याच्या वार्षिक माहितीपत्रकातील (एआयएस) माहिती ताडून पाहाणे हे आहे.

याखेरीज करदात्याने करकपातीसाठी विवरणपत्रात सादर केलेल्या प्रकटीकरणाच्या आधारे पुनश्च केंद्रीय माहितीशी त्याची पडताळणी करणे हेदेखील या विभागाचे काम आहे.

या कामांसाठी हा विभाग आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदत घेत आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३३ सी अंतर्गत विशेषाधिकार वापरून, प्राप्तिकर अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती कंपन्यांकडून मागवून, विभागाकडे असलेली माहिती अद्ययावत करीत आहेत व त्यानंतर करदात्याला नोटीस जारी करीत आहे.

प्राप्तिकर विभागाचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर’ (एआय) करदात्यांना ई-मेल नोटिस पाठवून माहितीतील विसंगती दूर करण्याबाबत सतर्क करत आहे. ३१ जुलैपर्यंत दाखल केलेल्या विवरणपत्र प्रक्रियेत, या वर्षी हा विभाग ‘एआय’च्या आधारे विसंगती शोधत आहे. यात ज्या करदात्यांनी परतावा मागितला आहे, त्यांची ‘टीडीएस’ कपात, परताव्याची रक्कम योग्य आहे का? यांची शहानिशा केली जात आहे.

ई-मेलचा गोषवारा

करदात्यांकडे गुंतवणुकीचा पुरावा नसेल किंवा करदात्याने विवरणपत्रामध्ये चुकीची करसवलत घेतली असेल, तर तत्काळ त्याची दुरुस्ती करून त्यात सुधारणा करा, असा ई-मेल अनेक करदात्यांना येत आहे.परताव्याची रक्कम कमी करणे किंवा दुरुस्त करणे हादेखील या नोटिसांचा उद्देश आहे.

८०जी अंतर्गत न दिलेल्या देणगीची चुकीची सूट घेतलेल्या पगारदार आणि छोट्या व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. फॉर्म १६ मध्ये दर्शविलेली व प्रत्यक्षात विवरणपत्रात दावा केलेली करकपात यात तफावत असेल,

तर परताव्याची पडताळणी करा, असा सल्ला याद्वारे दिला आहे. थोडक्यात, करविभागाने करदात्यांना त्यांनी दाखविलेले उत्पन्न, मिळणाऱ्या वजावटी, बँक तपशील, वैयक्तिक माहिती या संदर्भात विचारणा केली आहे.

प्राप्तिकर विभागाचा खुलासा

प्राप्तिकर विभागाने २६ डिसेंबर रोजी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाठविलेले संदेश करदात्यांना सुविधा देण्यासाठी आणि अहवाल देणाऱ्या संस्थांनी वर्षभरात नोंदवलेल्या व्यवहारांबाबत विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीची जाणीव करून देण्यासाठी आहेत. हे संदेश सर्व करदात्यांना पाठवलेल्या नोटिसा नाहीत, तर सल्ला आहे. करदात्यांनी सतर्क राहून कार्यवाही करावी, अशी सूचना याद्वारे देण्यात आली आहे.

माहितीतील तफावतीचे कारण

नोकरदाराने त्याच्या मालकाकडे वर्षभरात करकपात कमी व्हावी म्हणून ग्वाही दिलेली करावयाची गुंतवणूक आणि प्रत्यक्षात सेवकाने प्राप्तिकर विवरणपत्रामध्ये दर्शविलेली गुंतवणूक यांच्यात जेव्हा फरक असतो, तेव्हा करपात्र उत्पन्नात आणि देय प्राप्तिकरात तफावत येते. बहुतेकवेळा पगारदार, निधीच्या कमतरतेमुळे मालकास हमी देऊनही वेळेवर गुंतवणूक करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

उपाययोजना

करदात्याकडे सवलतीचा पुरावा नसला, तरी विवरणपत्रामध्ये सुधारणा करणे चांगले आहे; अन्यथा करनिर्धारणामध्ये अतिरिक्त कर, व्याज आणि २०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो. सुधारणा करून हा दंड टाळता येऊ शकतो.

ज्या करदात्यांना अशा नोटिसा मिळाल्या आहेत, त्यांनी प्रथम दावा केलेल्या सर्व गुंतवणुकीचे पुरावे गोळा करावेत. करदात्याकडे उत्तर देण्यासाठी १५ दिवस आहेत. ही संधी दवडू नये. करदात्याला अद्ययावत विवरणपत्र भरून दंडातून व मानसिक त्रासातून सुटका करून घेण्याची संधी देण्यात आली आहे, त्याचा लाभ घ्यावा; अन्यथा आर्थिक नुकसान संभवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT