income tax department  Sakal
Personal Finance

Income Tax: देशातील 5000 लोकांनी थकवला 43 लाख कोटींचा कर; कोणत्या राज्यात अडकला सर्वाधिक पैसा?

ITR Refund: आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. शेवटच्या तारखेपर्यंत 7 कोटींहून अधिक लोकांनी रिटर्न भरले आहेत. यानंतर विभागाकडून आयटीआरची छाननी केल्यानंतर परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राहुल शेळके

Income Tax: आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. शेवटच्या तारखेपर्यंत 7 कोटींहून अधिक लोकांनी रिटर्न भरले आहेत. यानंतर विभागाकडून आयटीआरची छाननी केल्यानंतर परतावा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता आयकर विभागाने अधिकाऱ्यांना टॉप 5,000 प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे, ज्यांच्यावर सुमारे 43 लाख कोटी रुपयांचा कर थकित आहे.

विशेष टीम तयार करण्याच्या सूचना

आयकर विभागाचा उद्देश कर संकलन सुधारणे आणि खटल्यातील अडकलेली रक्कम कमी करणे आहे. विभागाकडून अधिकाऱ्यांना विशेष टीम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

जेणेकरून प्रकरणांची पडताळणी केल्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस ही यादी CBDT कडे पाठवता येईल. करसंबंधित अनेक प्रकारचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. यापैकी सर्वाधिक थकबाकीदार प्रकरणे लवकर निकाली काढण्यात येतील.

महसूलवाढीवर केंद्र सरकारचा भर

दहा वर्षे जुन्या प्रकरणांचे मुल्यांकन करणे. करदात्यांना शोधून काढता येत नाही, तिथे वेगवेगळी रणनीती तयार करणे. कर मागणीवर लक्ष केंद्रित करणे, ही कामे अधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत. केंद्र सरकारला मोठ्या खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महसूल निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.

आठ लाख कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट

विभागाने 16.7 लाख कोटी रुपयांच्या संकलनाचा अंदाज व्यक्त केला आहे. यापैकी आठ लाख कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 35 % पेक्षा जास्त (2.8 लाख कोटी) मुंबईतून येण्याचे लक्ष्य आहे. यानंतर 86,692 कोटी रुपये दिल्लीतून आणि उर्वरित तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधून येणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT