Income Tax Notice Sakal
Personal Finance

Income Tax Notice: आयकर विभाग पगारदारांना पाठवत आहे नोटीस, तुम्ही पण केलीय 'ही' चूक!

आयटीआर भरताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे

राहुल शेळके

Income Tax Department Notice: आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. 31 जुलै 2023 नंतर रिटर्न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप रिटर्न भरला नसेल, तर तुमच्याकडे फक्त दोन दिवस आहेत.

आयटीआर भरताना तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण काही चुकांमुळे आयकर विभाग नोटीस पाठवू शकतो. आयकर विभाग पगारदार व्यक्तींना आयकर रिटर्न (ITR) भरताना दावा केलेल्या कर सूट आणि कपातीचा पुरावा मागण्यासाठी नोटीस पाठवत आहे.

जर करदात्याने जुन्या कर प्रणालीची निवड केली असेल तर आयकर कायद्यांतर्गत कर सवलतीचा दावा करण्याची परवानगी आहे. कोणताही करदाता एचआरए, प्रवास भत्ता, गृहकर्जावर भरलेले व्याज यावर कर सूट मागू शकतो.

आयकर विभागाकडून नोटीस का मिळू शकते?

असे काही करदाते आहेत जे बनावट भाड्याच्या पावत्या किंवा प्रवास बिलांचा वापर कर सवलतीचा दावा करण्यासाठी आणि आयकर वाचवण्यासाठी करतात. अशा परिस्थितीत आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.

सध्या आयकर विभाग अशा लोकांना नोटीस पाठवत आहे. हे करदाते मूल्यांकन वर्ष 2022-23 चे आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही चालू आर्थिक वर्ष किंवा मूल्यांकन वर्षासाठी ITR भरत असाल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

रिटर्न भरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही ITR भरत असाल आणि सवलतीचा दावा करणार असाल तर तुम्ही तुमच्या कागदपत्रांनुसार सवलतीचा दावा करावा.

त्यानुसार कर सूट मिळू शकते. तसेच ही सर्व कागदपत्रे वैध असावीत. जेणेकरून आयकर विभागाने दावा केलेल्या कागदपत्रांचा पुरावा मागितला तर तुम्ही तो सादर करू शकता.

नोंद: आयटीआर फाइलिंगमध्ये कोणतीही अडचण आल्यास, आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या युजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध माहितीची मदत घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT