Income Tax Refund Sakal
Personal Finance

Income Tax Refund: रिफंड यायला उशीर होतोय? लोड घेऊ नका; आता सरकार देणार व्याज, एवढा आहे व्याजदर

राहुल शेळके

Income Tax Refund: जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल आणि आता रिफंडची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, रिफंड प्रक्रियेला आता वेग आला आहे. सहसा परतावा 10 दिवस ते एका महिन्याच्या दरम्यान येतो. पण तुमचा इन्कम टॅक्स रिफंड अजून आला नसेल तर काळजी करु नका.

सरकार करदात्यांना विलंबित परताव्यावर व्याज देते. परतावा न मिळाल्यास तुम्ही काय करावे आणि परतावा मिळण्यास उशीर झाल्यास तुम्हाला किती व्याज दिले जाईल ते जाणून घेऊया.

करदाते आयटीआर रिफंडची आतुरतेने वाट पाहतात. परंतु जर तुम्ही आयटीआर योग्यरित्या भरला असेल, तरीही परतावा मिळण्यास विलंब होत असेल तर काळजी करू नका. तुम्हाला तुमचे पैसे व्याजासह मिळतील.

जर सरकार तुमचा कर परतावा जारी करण्यास उशीर करत असेल, तर ते तुम्हाला त्या कराच्या पैशावर व्याज देते (विलंबित कर परताव्यावर व्याज). हा परतावा मिळाल्याच्या तारखेपर्यंत दिला जातो. हे व्याज तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमचा ITR देय तारखेपर्यंत दाखल कराल.

साहजिकच आता मनात प्रश्न येईल की सरकारकडून व्याज किती मिळणार? तुम्हाला दर महिन्याला 0.5% म्हणजेच वार्षिक 6% व्याज दिले जाते. हे व्याज तुम्हाला 1 एप्रिलपासून परतावा मिळाल्याच्या तारखेपर्यंत दिले जाते. यामध्ये आणखी एक नियम आहे, तो म्हणजे, जर तुम्हाला मिळणारा परतावा तुमच्या एकूण कराच्या 10% पेक्षा कमी असेल तर तुम्हाला कोणतेही व्याज मिळणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata : ही दोस्ती..! रतन टाटांसाठी भावुक झाला शंतनू; पोस्ट लिहीत म्हणाला, "दु:ख ही प्रेमासाठी..."

Ashtami October 2024: नवरात्रीत अष्टमी -नवमी कधी साजरी केली जाणार? जाणून घ्या तारीख, वेळ अन् महत्व

Latest Maharashtra News Updates : संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

'देशाला म्लेंच्छ बाधा झालीये, गांधीवादी विचार आत्मसात केल्याने देश नरक झालाय'; काय म्हणाले संभाजी भिडे?

IND vs BAN 2nd T20I: हम 'सात'!भारतीय संघाने ट्वेंटी-२०त नोंदवला भारी रेकॉर्ड; पाकिस्तानच्या नाकावर मारली टिचकी

SCROLL FOR NEXT