ITR Late Penalty Sakal
Personal Finance

ITR Late Penalty: काहीच दिवस शिल्लक! ITR भरण्यास उशीर झाला तर दंडासह नोटीशीला द्यावे लागेल उत्तर

राहुल शेळके

Income Tax Return File Online Before Last Date July 31 Check ITR late fees charges : आर्थिक वर्ष 2022-23 साठी ITR भरण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.

आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही आयटीआर भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल, तसेच तुम्हाला आयकर विभागाच्या सूचनेला सामोरे जावे लागेल.

ITR भरण्यास उशीर झाल्यास दंड

आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलैपूर्वी हे काम केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. नियमांनुसार, उशीरा आयटीआर फाइलिंग फी लहान करदात्यांना म्हणजे 3 लाख रुपयांपर्यंत कमावणाऱ्यांसाठी 1,000 रुपये आहे.

ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 5,000 रुपये दंड भरावा लागू शकतो. 2021 पर्यंत उशीरा दंड म्हणून 10,000 रुपये भरावे लागत होते, परंतु नवीन नियमांनुसार ते कमी करण्यात आले आहेत.

ITR दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जर तुम्ही पगारदार असाल तर तुम्हाला ऑफिसमधून फॉर्म 16 घ्या

  • फॉर्म 26AS

  • बँकेत एफडी असल्यास किंवा लाभांश मिळाल्यास त्याची कागदपत्रे

  • म्युच्युअल फंड, मालमत्ता, शेअर्स आणि सोन्याचे दस्तऐवज

  • परदेशात मालमत्ता असेल तर त्याची कागदपत्रे

आयटीआर ऑनलाइन कसा भरावा?

  • Incometax.gov.in वर प्राप्तिकराच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.

  • त्यानंतर व्यू रिटर्न किंवा फॉर्मवर क्लिक करा.

  • ई-फाइल केलेले कर रिटर्न पहा.

  • यानंतर, मूल्यांकन वर्ष, आयटीआर फॉर्म क्रमांक, फाइलिंग प्रकार मूळ/सुधारित रिटर्न निवडा.

  • त्यानंतर continue वर क्लिक करा आणि मागितलेली माहिती भरा.

  • टॅक्स पेड आणि व्हेरिफिकेशन पेज येईल, त्यावर तुम्हाला त्यानुसार पर्याय निवडावा लागेल.

  • त्यानंतर प्रीव्ह्यू करा आणि फॉर्म नीट तपासून सबमिट करा.

  • टीप- आयटीआर फाइलिंगमध्ये कोणतीही अडचण आल्यास, आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या युजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध माहितीची मदत घ्या.

नोंद: आयटीआर फाइलिंगमध्ये कोणतीही अडचण आल्यास, आयकर विभागाच्या वेबसाइटवर दिलेल्या युजर मॅन्युअलमध्ये उपलब्ध माहितीची मदत घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT