Income Tax Return Esakal
Personal Finance

Income Tax Return: मृत व्यक्तीलाही इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो? जाणून घ्या कोण फाइल करु शकतो

ITR भरण्यासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

राहुल शेळके

Income Tax Return: तुम्हाला हे थोडं विचित्र वाटेल, पण तुम्हाला माहीत आहे का की मृत व्यक्तीचीही आयकर रिटर्न फाइल असते. आयकर नियमांनुसार, जर मृत व्यक्तीचे कोणतेही उत्पन्न असेल तर त्याचे रिटर्न (ITR) भरावे लागेल.

अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर वारस इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो. नियमासोबतच, मृत व्यक्तीचे आयकर विवरणपत्र भरणे कायदेशीर वारसाचे कर्तव्य आहे.

आयकर रिटर्न घरी बसून भरता येतात. मृत व्यक्तीचे आयकर रिटर्न भरण्यापूर्वी, कायदेशीर वारसाने स्वतःची उत्तराधिकारी म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यक्ती जिवंत असेपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरले पाहिजे.

ITR भरण्यासाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

  • सुरुवातीला www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.

  • आता पासवर्ड आणि पॅनसह लॉग इन करा आणि My Account वर जा.

  • त्यानंतर Representative म्हणून नोंदणी करा.

  • आता नवीन Request वर जा आणि पुढे जा.

  • पॅन कार्ड, मृत व्यक्तीचे नाव आणि बँक तपशील इत्यादी भरा.

  • Request Accept झाल्यानंतर कारवाई केली जाईल.

मृत व्यक्तीचा ITR कसा भरावा

  • वेबसाइटवर स्वतःची नोंदणी केल्यानंतर आयटीआर फॉर्म डाउनलोड करा.

  • आता सर्व तपशील भरल्यानंतर, फॉर्मची XML फाईल तयार करा, कारण ती फक्त XML स्वरूपातच अपलोड होते.

  • पॅन कार्ड तपशील असलेल्या पर्यायामध्ये कायदेशीर वारसाचा तपशील द्यावा लागेल.

  • आता आयटीआर फॉर्मचे नाव आणि वर्षाचा पर्याय निवडा.

  • XML फाइल अपलोड केल्यानंतर आणि त्यावर डिजिटल स्वाक्षरी केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.

मृत व्यक्तीचे उत्पन्न कसे मोजणार?

तज्ञांच्या मते, मृत व्यक्तीच्या उत्पन्न मोजण्यासाठीची प्रक्रिया सर्व वजावट आणि सवलतींनंतर सामान्य उत्पन्नाप्रमाणेच असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT