Income Tax Return Sakal
Personal Finance

Income Tax: 5 लाखांपेक्षा कमी पगार असला तरीही भरावा लागेल ITR, जाणून घ्या नियम नाहीतर भरावा लागेल दंड

Income Tax Return: असे बरेच लोक आहेत ज्यांच्यावर कोणतेही कर दायित्व नाही. अशा लोकांना बर्‍याचदा असे वाटते की त्यांना आयटीआर भरण्याची गरज नाही.

राहुल शेळके

Income Tax Return: प्राप्तिकर कायद्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे आणि जर तुम्ही या तारखेपर्यंत ITR फाइल न केल्यास तुम्हाला दंड आकारला जाईल.

असे बरेच लोक आहेत ज्यांच्यावर कोणतेही कर दायित्व नाही. अशा लोकांना बर्‍याचदा असे वाटते की त्यांना आयटीआर भरण्याची गरज नाही. असे नाही, अशा लोकांना देखील ITR भरणे आवश्यक आहे.

कोणाला कर भरावा लागत नाही?

जुन्या कर प्रणालीनुसार जर तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला आयकर भरण्याची गरज नाही. दुसरीकडे, जर मूल्यांकन वर्षात तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, म्हणजेच तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत येत असाल, आणि तुमचा पगार 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.

जर तुमचे वय 75 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला पेन्शन किंवा बँकेच्या व्याजातून उत्पन्न मिळत असेल, तर आयटीआर फाइल करण्याची गरज नाही.

जर तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली असेल, तर प्रत्येकाला 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी ही मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पगार 5 लाख रुपयांपेक्षा कमी असला तरीही ITR भरावा लागेल

असे अनेक लोक आहेत ज्यांचा पगार 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांच्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही, परंतु अशा लोकांसाठी देखील आयटीआर भरणे आवश्यक आहे.

कारण 2.5 लाखांपेक्षा जास्त पगारावर 5% कर आकारला जातो, परंतु ITR भरताना तुम्हाला 87A अंतर्गत सूट मिळते. ही सूट 12,500 रुपयांपर्यंत आहे. यामुळेच 5 लाख रुपयांपर्यंतचा पगार करमुक्त होतो.

जर तुमचा पगार 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, परंतु सर्व कपातीचा दावा केल्यानंतर, तुमचा करपात्र पगार 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी झाला, तरीही तुम्हाला ITR फाइल करणे आवश्यक आहे.

याचे कारण असे की जेव्हा तुम्ही ITR फाइल करता तेव्हाच हे कळेल की तुम्हाला कोणती सुट मिळेल, तसेच तुमच्यावर कर आकारला जाईल की नाही.

उदाहरणाने समजून घ्या

समजा तुमचा पगार 4.5 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला आयटीआर दाखल करावा लागेल. जेव्हा तुम्ही ITR दाखल करता, त्याच वेळी तुम्हाला 2.5 लाख रुपयांच्या वर 5% दराने आकारलेल्या करावर 10,000 रुपये सवलत मिळेल आणि तुमचे कर दायित्व शून्य असेल.

तुमचा पगार 5.50 लाख रुपये असला तरीही तुम्हाला ITR भरावा लागेल. या प्रकरणात देखील आपल्याकडून कोणताही कर आकारला जाणार नाही.

कारण तुम्हाला 50,000 रुपयांची मानक वजावट मिळेल. दुसरीकडे, जर तुमचा पगार 5 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला सवलत मिळते त्यामुळे तुमचे कर दायित्व शून्य असेल.

आता तुमचा पगार 2 लाख रुपये आहे असे समजू. हे मूळ सूट पेक्षा कमी आहे म्हणजेच 2.5 लाख रुपये. अशा परिस्थितीत तुम्हाला आयटीआर फाइल करण्याची गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT