Income Tax Free State sikkim
Personal Finance

Income Tax: भारतातलं एकमेव राज्य जिथे हजारो-कोटी रुपये कमावले तरी 1 रुपयाही द्यावा लागत नाही कर, जाणून घ्या कारण

Income Tax Free State in India: वित्तीय वर्ष 2023-24 साठी परतावा दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. ज्यांनी या तारखेपर्यंत आयटीआर दाखल केला नाही त्यांना दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम आपल्या कमाईवर अवलंबून असते.

राहुल शेळके

Income Tax Free State in India: वित्तीय वर्ष 2023-24 साठी परतावा दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. ज्यांनी या तारखेपर्यंत आयटीआर दाखल केला नाही त्यांना दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम आपल्या कमाईवर अवलंबून असते.

31 जुलै नंतरही बर्‍याच लोकांना परतावा दाखल करण्याची परवानगी दिली जाईल. पण भारतातील एक राज्य असे आहे जिथे लोकांनी वर्षात एक हजार किंवा एक कोटी कमावले तरी त्यांना 1 रुपया देखील कर द्यावा लागत नाही.

देशात फक्त एकच राज्य आहे जे करमुक्त राज्य म्हणून ओळखले जाते. येथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही. या राज्याचे नाव सिक्किम आहे. सिक्किमच्या लोकांना विशिष्ट कायद्यांतर्गत आयकरातून सुट दिली आहे.

सिक्किमला कर सवलत का दिली जाते?

सिक्किमच्या लोकांना इतकी मोठी सवलत का देण्यात आली आहे? हे जाणून घेण्यापूर्वी, आपल्याला सिक्किमच्या इतिहासाबद्दल समजून घ्यावे लागेल. सिक्किम स्वतंत्र देश होता. तो 1975 मध्ये भारतामध्ये विलीन झाला. परंतु विलीनीकरणासाठी, सिक्किमच्या राजाने एक अट ठेवली होती, ज्या अंतर्गत राज्यासाठी काही विशेष हक्कांची मागणी केली गेली होती.

आयकर कायद्याखाली विशेष हक्क

त्यावेळी, सिक्किमच्या अटींनुसार भारत सरकारने राज्यातील नागरिकांना आयकरच्या कक्षेतून मुक्त केले होते. येथील मूळ रहिवाशांना आयकर कायद्याच्या कलम 1961च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत आयकरातून सूट देण्यात आली आहे.

घटनेच्या कलम 371-एफ अंतर्गत सिक्किमला विशेष दर्जा मिळाला आहे. आयकरच्या कलम 10 (26AAA) अंतर्गत तरतूद आहे की सिक्किमच्या कोणत्याही रहिवाशाचे उत्पन्न करमुक्त असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT