increase in annual sales of houses in Pune Sakal
Personal Finance

Pune: पुण्यात घरांच्या वार्षिक विक्रीत लक्षणीय वाढ; आलिशान घरांना सर्वाधिक मागणी

Pune: पुण्याच्या निवासी बाजारपेठेत वर्ष २०२३ मध्ये वार्षिक विक्रीत १३.५ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असून, वर्षभरात ४९,२६६ घरांची विक्री झाली आहे. ही २०१३ नंतरची घरांची सर्वोत्तम विक्री आहे. घरांची सरासरी किंमतही वार्षिक पाच टक्क्यांनी वाढून ४,५०७ रुपये प्रति चौरस फूट झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे: पुण्याच्या निवासी बाजारपेठेत वर्ष २०२३ मध्ये वार्षिक विक्रीत १३.५ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असून, वर्षभरात ४९,२६६ घरांची विक्री झाली आहे. ही २०१३ नंतरची घरांची सर्वोत्तम विक्री आहे. घरांची सरासरी किंमतही वार्षिक पाच टक्क्यांनी वाढून ४,५०७ रुपये प्रति चौरस फूट झाली आहे, अशी माहिती ‘नाइट फ्रँक इंडिया’ने इंडिया रिअल इस्टेट २०२३ मध्ये ताज्या अहवालात दिली आहे.

गृहकर्जाचे दर वाढले असले, तरी ग्राहकांचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याने विक्री वाढली आहे. गृहखरेदीदारांमध्ये प्रामुख्याने स्थलांतरित कामगार, उच्च पगारदार यांचा समावेश आहे. आलिशान घरांच्या (एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत) मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

देशातील आघाडीच्या आठ महानगरांमध्ये आलिशान घरांच्या मागणीमध्ये पुण्याने सर्वात जास्त वार्षिक वाढ नोंदविली आहे. एक कोटी रुपये किंमतींच्या घरांची मागणी २०२२ मधील नऊ टक्क्यांवरून २०२३ मध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढली, असे या अहवालात म्हटले आहे.

पुण्यात ५० लाख ते एक कोटी रुपये किंमतींच्या श्रेणीतील घरांची विक्री २०२२ मधील ४३ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ४६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

५० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतींच्या घरांच्या विक्रीत मात्र, घट झाली आहे. वर्ष २०२२ मधील ४८ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ती ३८ टक्क्यांवर आली आहे. पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी किंमतींच्या घरांच्या विक्रीत दहा टक्के घट झाली.

नवे प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाणही वाढत असून, सरलेल्या वर्षात एकूण ४२,४३७ घरे तयार झाली, त्यात वार्षिक दहा टक्के वाढ झाली आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्यालयीन जागांची विक्रीही गेल्या वर्षात २०२२ च्या तुलनेत नऊ टक्क्यांनी वाढली आहे.

कार्यालयीन वापरासाठी ६७ लाख चौरस फूट जागेची विक्री झाली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये वर्ष २०२३ मध्ये सातत्यपूर्ण वाढ झाली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आयटी हब म्हणून विकसित झालेले हे शहर एक महत्त्वाचे गृहनिर्माण ठिकाण म्हणून सक्षमरित्या स्थापित झाले आहे.

— विलास मेनन, संचालक, नाइट फ्रँक इंडिया

ठळक वैशिष्ट्ये...

  • पुण्यात २०२३ मध्ये ४९,२६६ घरांची विक्री

  • आठ मुख्य शहरांमध्ये आलिशान घरांना सर्वाधिक मागणी

  • पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी किमतींच्या घरांच्या विक्रीत घट

  • किंमतीत सरासरी वार्षिक पाच टक्के वाढ

  • वर्षभरात ४२,४३७ नव्या घरांची निर्मिती

  • वार्षिक वाढ ९.८ टक्के

  • जागेचा सरासरी दर ४,४७२ रुपये चौरस फूट

  • कार्यालयीन जागेच्या विक्रीतही नऊ टक्के वाढ

विक्री किंमत (रु.) विक्रीचे आकडे वार्षिक वृद्धिदर

५० लाख १८,८५८ उणे १०

५० लाख ते १ कोटी २२,९०८ २३ टक्के

एक कोटी ७५०० ९३ टक्के

एकूण ४९,२६६ एकूण १३ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT