India drops to 5th position on Maldives tourism markets UK China tourist share increased  sakal
Personal Finance

Maldives Tourism Market : 'बॉयकॉट ट्रेंड'चा मालदीव पर्यटनाला किती फटका बसला? आकडेवारी आली समोर

Maldives Tourism Market : मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर हे दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेल्याचे पाहायला मिळाले होते

रोहित कणसे

Maldives Tourism Market Latest Update : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून तणावाचे बनले आहेत. मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळा बायकॉट मालदीव अशी हाक सोशल मीडियावर देण्यात आली. अनेकांनी मालदीवच्या ट्रीप कॅन्सल केल्याचे देखील समोर आले. दरम्यान याचा कितपत फटका मालदीवला बसला याबद्दलची आकडेवारी आता समोर आली आहे.

मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे दोन्ही देशात वाढलेल्या तणावाचा फटका मालदीवच्या पर्यटन विभागाला बसल्याचे पाहायला मिळत आहे. मालदीवच्या पर्यटनात भारताचा वाटा घसरला चांगलाच आहे.

मालदीव जगभरात तेथील सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. दरम्यान मागच्या काही दिवसात मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकडेवारीत मोठा फरक पडला आहे. मालदीवला सर्वाधिक संख्येने भेट देणाऱ्यांमध्ये भारतीयांचा क्रमांक तिसरा होता, तो अवघ्या तीन आठवड्यांच्या काळात खाली घसरून पाचवा झाला आहे. मालदीव पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

मालदीवला पर्यटनासा्ठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. २०२३ च्या आकडेवारीनुसार ११ टक्के पर्यटक हे भारतीय होते. मात्र नुकतेच झालेल्या पंतप्रधान मोदींबद्दलच्या वादग्रस्त विधानानंतर या पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

वाद काय होता?

हा वाद सुरू झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदीनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर. या भेटीचे फोटो पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया वर पोस्ट केले आणि लक्षद्वीप बेटांना भेट देण्याचे आवाहन नागरिकांना केलं. याचा मालदीवमधील काहींनी त्याच्या देशात येणाऱ्या पर्यटकांना दुसरीकडे वळवण्याचा हा एक प्रयत्न असल्याचा अर्थ लावण्यात आला. मोहम्मद मुइझु सरकारमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधानांविरुद्ध अपमानास्पद टिप्पण्या पोस्ट केल्या, ज्यामुळे भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मालदीवविरोधी वातावरण तयार झालं. सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड करु लागले होते.

यानंतर अनेकांनी त्याच्या मालदीव ट्रीप रद्द केल्या. इतकेच नाही तर इज माय ट्रीप सारख्या कंपन्यांनी मालदीवच्या सर्व बुकिंग्ज देखील रद्द केल्या.

मालदीवच्या पर्यटन विभागाच्या वेबसाइटनुसार, 2024 च्या सुरुवातीला भारत ७.१ टक्के मार्केट शेअरसह पर्यटनात योगदान देणारा तिसरा सर्वात मोठा वाटेकरी होता. तर चीन पहिल्या १०च्या यादीतही नव्हता.

भारत मालदीव यांच्यातील तणावानंतर ही संख्या मात्र अचानक बदलली. २८ जानेवारीपर्यंत मालदीव पर्यटनामध्ये भारताचा मार्केट शेअर ८ टक्के होता, तर चीन आणि ब्रिटनने भारताला मागे टाकून अनुक्रमे पहिल्या १० च्या यादीत तिसरे आणि चौथे स्थान मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT