India emerges as world’s services factory Goldman Sachs report  Sakal
Personal Finance

Service Sector: जागतिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा 18 वर्षांत झाला दुप्पट; 'या' क्षेत्रात सर्वाधिक वाढ

राहुल शेळके

Service Sector Growth: भारताच्या विकासात सेवा क्षेत्राला महत्त्वाचे स्थान आहे. जागतिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा 18 वर्षांत दुप्पट झाला आहे. सोमवारी एका जागतिक अहवालात म्हटले आहे की ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सने (GCC) सेवा क्षेत्राच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

GCC च्या प्रसारामुळे रिअल इस्टेटला चालना मिळाली आहे. यामुळे सेवांच्या निर्यातीचा विस्तार झाला आहे. यामुळे आर्थिक वाढ झाली, नोकऱ्या निर्माण झाल्या आणि या कंपन्यांच्या महसुलातही वाढ झाली आहे.

GCC या जगभरात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी स्थापन केलेल्या ऑफशोर संस्था आहेत, ज्या IT, HR, Finance, Analytics यासह अनेक व्यवसाय सेवांना चालना देतात.

Goldman Sachsने अहवालात म्हटले आहे की, भारतातील GCC महसूल गेल्या 13 वर्षात 11.4%ने वाढला आहे. या कालावधीत GCC ची संख्या 700 वरून 1,580 पर्यंत वाढली आहे. या क्षेत्राने अंदाजे 13 लाख कर्मचारी जोडले आहेत(11.6% CAGR), एकूण कर्मचारी संख्या FY2013 मध्ये 17 लाख झाली.

"जागतिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा 2005 मधील 2% वरून 2023 मध्ये 4.6% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, तर वस्तूंच्या आयातीत भारताचा वाटा 2005 मधील 1% वरून 2023 मध्ये 1.8% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे," असे अहवालात म्हटले आहे.

सेवा क्षेत्रातील संगणक सेवा हे प्रमुख उपक्षेत्र राहिले आहे. 2023 मध्ये भारताच्या सेवा निर्यातीपैकी हे जवळपास निम्मे आहे. व्यावसायिक सल्लागार निर्यात हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे.

सेवा क्षेत्र काय आहे?

सेवा क्षेत्र हे असे क्षेत्र आहे जे उत्पादन क्षेत्राच्या विरुद्ध आहे. ज्यामध्ये सेवांचे उत्पादन आणि वितरण केले जाते. यामध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, आरोग्य सेवा, शिक्षण, आर्थिक सल्ला, पर्यटन आणि अलीकडे इंटरनेट सेवा अशा विविध सेवांचा समावेश आहे.

सेवा क्षेत्र हे एक व्यापक क्षेत्र आहे, जे जगभरातील अर्थव्यवस्थांचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे क्षेत्र आधुनिक अर्थव्यवस्थेत रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देते आणि ग्रामीण भागाच्या विकासातही मोठी भूमिका बजावते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT