Bhavish Aggarwal Sakal
Personal Finance

Bhavish Aggarwal: ईस्ट इंडिया कंपनीसारखी लूट केली जात आहे; भाविश अग्रवाल यांचा विदेशी कंपन्यांवर हल्ला

राहुल शेळके

OLA CEO: ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी पुन्हा एकदा परदेशी कंपन्यांवर हल्ला केला आहे. ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे परदेशी कंपन्या भारताचा डेटा चोरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाविश अग्रवाल यांनी याला टेक्नो वसाहतवाद म्हटले आहे. ते म्हणाले की या कंपन्या भारताचा डेटा जागतिक डेटा केंद्रांना पाठवत आहेत. प्रक्रिया केल्यानंतर हा डेटा परत भारतात विकला जातो.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाविश अग्रवाल म्हणाले की, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीनेही आमच्या संसाधनांचे असेच शोषण केले. ब्रिटीश कंपन्यांनी भारतीय संसाधनांचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केल्याचे ते म्हणाले. आज परदेशी कंपन्याही तेच करत आहेत. ते म्हणाले की, भारतात कोणत्याही ॲपच्या युजरची संख्या कोटींमध्ये आहे.

अग्रवाल यांनी युक्तिवाद केला की यापैकी केवळ एक दशांश डेटा (डेटा) भारतात साठवला जातो. 90 टक्के डेटा भारताबाहेर जातो. त्यावर AI मध्ये प्रक्रिया केली जाते, भारतात परत डेटा आणला जातो आणि डॉलरमध्ये विकला जातो.

आपल्याला अशी प्रणाली तयार करावी लागेल की आपला डेटा आपल्याकडेच राहील. भारत 20 टक्के डेटा तयार करतो. म्हणजेच जगात कोणत्याही अॅपचे युजर असतील तर त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.

AIच्या जगात आपले वर्चस्व निर्माण करा

अग्रवाल म्हणाले की, भारत एआयच्या क्षेत्रात खूप काही करू शकतो. जर आपण भारतीय म्हणून AI च्या जगात आपली ताकद वापरली तर काहीही अवघड नाही. हे करण्यासाठी आपण अधिक डेटा तयार केला पाहिजे. आपला डेटा आपल्याकडे राहील याचीही खात्री केली पाहिजे.

ओलाचे सीईओ म्हणाले की ईस्ट इंडिया कंपनी कापूस निर्यात करायचे आणि कपडे परत आणायचे आणि आपल्याला विकायचे. तसाच हा टेक्नो वसाहतवाद आहे. भारतीय परिसंस्थेत हे भांडणे कायदेशीर नाही. हे आपण समजून घेतले पाहिजे. ही तंत्रज्ञानाची लढाई आहे. आपल्या संस्कृतीनुसार आपल्याला आपले तंत्रज्ञान विकसित करावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT