India fastest-growing G20 country but also poorest, says Raghuram Rajan  Sakal
Personal Finance

Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

Raghuram Rajan: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, भारत लवकरच जर्मनी आणि जपानला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे ज्यामुळे भारत एकूण जीडीपीच्या बाबतीत इतर अनेक राष्ट्रांना मागे टाकत आहे.

राहुल शेळके

Raghuram Rajan: आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, भारत लवकरच जर्मनी आणि जपानला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे ज्यामुळे भारत एकूण जीडीपीच्या बाबतीत इतर अनेक राष्ट्रांना मागे टाकत आहे. मात्र, यादरम्यान त्यांनी एक चिंताही व्यक्त केली.

रघुराम राजन म्हणाले, पण मोठा प्रश्न असा आहे की, भारत वृद्ध देश होण्याआधीच भारतीय श्रीमंत होऊ शकतील की नाही हा खरा मुद्दा आहे? राजन म्हणाले की 2047-2050 पर्यंत भारतातील लोकसंख्येचा एक मोठा भाग वृद्ध होईल. जोपर्यंत भारत 6 किंवा 6.5 टक्के दराने आर्थिक विकास करत नाही तोपर्यंत भारत एक श्रीमंत देश बनू शकणार नाही.

रघुराम राजन म्हणाले की, भारताने अलीकडेच एकूण जीडीपीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या यूकेला मागे टाकले आहे. जागतिक स्तरावर अनेक श्रीमंत देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी खूप चांगली असल्याचे ते म्हणतात. ते म्हणाले की, भारत सध्या लोकसंख्येशी संबंधित घटकांचा फायदा घेत आहे.

राजन यांच्या म्हणण्यानुसार, जर भारताने आपल्या तरुण कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे काम दिले तर ते आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरु शकते. रघुराम राजन म्हणाले, "युवक मोठ्या संख्येने श्रमशक्तीमध्ये सामील होत आहेत, जर आपण त्यांचा योग्य वापर केला तर भारत खूप वेगाने पुढे जाऊ शकेल."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे हुकूमशाही सरकार असल्याचे वर्णन करताना रघुराम राजन म्हणाले की, अशी सरकारे पायाभूत सुविधांच्या विकासाच्या आघाडीवर यशस्वी होतात कारण त्यांना पर्यावरणासारख्या मुद्द्यांवर जलद मंजुरी मिळू शकते. अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर रघुराम राजन म्हणाले, जर कोणतेही सरकार आपल्या मोठ्या लोकसंख्येला द्वितीय श्रेणीतील नागरिकांसारखे वागवत असेल तर तो देश कधीही यशस्वी होणार नाही.

नुकताच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) आपला अहवाल इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 या नावाने प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये तरुणांमधील रोजगाराच्या स्थितीबाबत एक आकडेवारी जाहीर केली आहे. ILO ने भारतातील बेरोजगारीची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे.

आयएलओच्या अहवालानुसार चांगल्या दर्जाच्या रोजगाराच्या संधी नसल्यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त आहे. अहवालात असे म्हटले आहे की देशातील 83 टक्के तरुण बेरोजगार आहेत. या अहवालात असे सांगण्यात आले की, एकूण बेरोजगार तरुणांमध्ये माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या तरुणांची संख्या, जी 2000 मध्ये 35.2 टक्के होती, ती 2022 मध्ये जवळपास दुप्पट होऊन 65.7 टक्के झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT