india has invested more than required in cricket but return on investment less says expert  Esakal
Personal Finance

CWC 2023: क्रिकेटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करुन देशाला किती फायदा होतो?

CWC 2023: भारताची क्रिकेटमधील गुंतवणूक इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.

राहुल शेळके

CWC 2023: नुकत्याच झालेल्या ICC क्रिकेट विश्वचषक 2023च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. मात्र, शेवटी सर्व चाहत्यांची निराशा झाली.

अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा भारतीय संघ आणि खेळाडूंच्या मूल्यांकनावर परिणाम होतो का? भारत क्रिकेट या खेळात मोठी गुंतवणूक करतोय तर त्याचा खरचं देशाला फायदा होतो का? ते जाणून घेऊया.

भारतीय क्रिकेटमधील व्यावसायिक परतावा किंवा नफा याचा थेट संबंध संघाच्या कामगिरीशी किंवा मैदानावरील गुंतवणुकीशी नसतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Renaissance Investment Managers Pvt. चे संस्थापक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी पंकज मुरारका यांनी एका नोटमध्ये म्हटले आहे की, भारताने ऑस्ट्रेलियापेक्षा कमी विश्वचषक जिंकले आहेत. असे असूनही, भारत हे क्रिकेटचे आर्थिक शक्तीस्थान आहे.

खेळाडूंचे मानधनही ही जास्त

भारतात क्रिकेटच्या मूल्यांकनाचा फुगा आहे आणि तो फुगा आता कधीही फुटू शकतो. मुरारका यांनी सांगितले की, भारतातील क्रिकेट संपत्तीचे मूल्यांकन वाजवीपेक्षा जास्त आहे. खेळाडूंची फी जास्त आहे. या खेळामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे गुंतवले गेले आहेत.

भारताने आतापर्यंत 13 पैकी फक्त दोन विश्वचषक जिंकले आहेत. म्हणजे भारताचा 15% स्ट्राइक रेट आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्ट्राइक रेट 50% आहे. बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना आहे आणि भारताची क्रिकेटमधील गुंतवणूक इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. मात्र या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा खूपच कमी आहे. यामुळे क्रिकेट हा भारतासाठी जास्त गुंतवणुक करुन कमी परतावा देणारा खेळ बनला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इतर खेळांमध्ये गुंतवणूक करावी लागेल

भारतातील इतर कोणत्याही खेळाला क्रिकेटला दिलेल्या भावनिक, आर्थिक, पायाभूत आणि राष्ट्रीय समर्थनापैकी 10% वाटा मिळाला असता तर भारत इतर कोणत्याही खेळात जागतिक पातळीवर चमकला असता. त्यामुळे भारताने इतर खेळांमध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवावा असे तज्ज्ञांचे मत आहे.

दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत हरला असला तरी सर्व प्रमुख खेळाडूंच्या कमाईत कमालीची वाढ होणार आहे. याचे कारण म्हणजे विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीनंतर अनेक खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे. खेळाडूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पोर्ट्स मार्केटिंग कंपन्या आता त्यांच्या क्लायंटसाठी जास्त अॅन्डोर्समेंट फीची मागणी करत आहेत.

The Economic Timesच्या अहवालात राइज वर्ल्डवाइड या स्पॉन्सरशिप सेल्स अँड टॅलेंट कंपनीचे प्रमुख निखिल बर्डिया म्हणाले की, विश्वचषक जिंकला नसला तरी, खेळाडू़ंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामुळे त्यांची लोकप्रियता नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर त्यांची ब्रँड व्हॅल्यू वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT