Pharmaceutical industry sakal
Personal Finance

Pharma Industry: भारतीय औषधांचा अमेरिकेत डंका! दोन देशांना मागे टाकून बनणार सर्वात मोठा निर्यातदार

राहुल शेळके

Pharmaceutical industry: भारतीय वस्तू आता जगभरात ब्रँड म्हणून प्रस्थापित होत आहेत. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भारतात बनवलेल्या वस्तूंची मागणी अमेरिकेसह इतर विकसित देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे. गेल्या 10 वर्षांत भारताच्या एकूण निर्यातीत अमेरिकेचा वाटा 19 टक्क्यांवरून 23 टक्क्यांवर पोहोचला आहे.

त्याचबरोबर भारताच्या एकूण निर्यातीत युरोपचा वाटा 18 टक्क्यांवरून 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण निर्यातीत विकसित देशांचा वाटा वाढल्याने हे सिद्ध होत आहे की, भारतात बनवलेल्या विविध वस्तू आता इतर देशांमध्येही आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत.

पाश्चिमात्य देशांच्या निर्यातीत वाढ झाल्यामुळे भारतीय निर्यातीतील आशियाई देशांचा वाटा गेल्या 10 वर्षांत कमी झाला आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी भारतीय वस्तूंची खरेदी कमी केली आहे, उलट इतर देशांतील वाढत्या मागणीचा हा परिणाम आहे.

अमेरिकेत भारतीय औषधांची मोठी मागणी

आता भारताच्या औषध निर्यातीत अमेरिकेचा वाटा कसा आणि किती वाढला आहे ते समजून घेऊ. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या डेटानुसार, भारताचा फार्मा आणि वैद्यकीय उद्योग अमेरिका, यूके आणि इटलीच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये आपला ठसा उमटवत आहे.

अमेरिकेसाठी भारत हा औषध निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश आहे. 2023 मध्ये टॉप 3 पुरवठादारांपैकी भारत हा एकमेव देश होता ज्याने आपला बाजारातील हिस्सा वाढवला आहे. तर इतर दोन देश आयर्लंड आणि स्वित्झर्लंड यांचा बाजारातील हिस्सा कमी झाला आहे. आता भारत अमेरिकेसाठी अव्वल निर्यातदार होण्याच्या काही पाऊले दूर आहे.

भारताने अमेरिकेला औषधांची निर्यात 2023 मध्ये 7.33 अब्ज डॉलर केली होती. 2022 मध्ये औषधांची निर्यात 9.08 अब्ज डॉलर पर्यंत वाढवली होती. या वाढीमुळे भारताचा वाटा 2022 च्या 10.08% वरून 2023 मध्ये 13.1% वर गेला आहे. यात आयर्लंडचा हिस्सा 13.85% पर्यंत घसरला आहे.

दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यातदार स्वित्झर्लंडचा हिस्सा 2023 मध्ये 13.7% इतका खाली आला आहे. जो 2022 मध्ये 17.4% होता. तीन निर्यातदार देश अमेरिकेला सुमारे 9 अब्ज डॉलरची औषधे विकत आहेत.

उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा फायदा

फार्मा आणि वैद्यकीय उत्पादन हे भारत सरकारचे प्राधान्य क्षेत्र आहे. ही दोन क्षेत्रे उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) योजना मिळवणारी पहिली क्षेत्रे आहेत.

आव्हाने असूनही, औषधे आणि फार्मा क्षेत्रातील भारताची निर्यात जानेवारी 2024 पासून दरमहा वाढत आहे. अमेरिकेबरोबरच नेदरलँड, ब्रिटन, इटली, फ्रान्स, यूएई सारखे विकसित देशही भारतात बनवलेल्या औषधांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.

भारतीय फार्मास्युटिकल कंपन्या आफ्रिका, विशेषत: नायजेरिया आणि सीआयएस देशांवरही लक्ष ठेवून आहेत, ज्यात रशिया आणि इतर काही देश आहेत. जिथे भारत बाजारपेठ वाढवण्याची योजना आखत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: मलिदा गँग, बारामती अन् इंदापूर... हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Latest Maharashtra News Updates : अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात निवडणूकांबाबत चर्चा

Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला तेच शेअर्स कोसळले

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या वेगळ्या नावाने का विकतात? या सणासुदीला नवीन कार घेण्याआधी ही बातमी नक्की वाचा..

SCROLL FOR NEXT