Employment  sakal
Personal Finance

Employment : भारतात ११.५ कोटी रोजगारांची गरज;‘नॅटिक्सिस एसए’च्या अहवालातील मत

भारतात २०३० पर्यंत ११.५ कोटी रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे, असे ‘नॅटिक्सिस एसए’ या जागतिक संस्थेने आज जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘‘भारताला २०३० पर्यंत ११.५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन असलेल्या आणि नव्या श्रमशक्तीचाही सुयोग्य वापर केला जाईल.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात २०३० पर्यंत ११.५ कोटी रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे, असे ‘नॅटिक्सिस एसए’ या जागतिक संस्थेने आज जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘‘भारताला २०३० पर्यंत ११.५ कोटी नोकऱ्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन असलेल्या आणि नव्या श्रमशक्तीचाही सुयोग्य वापर केला जाईल.

वर्ष २०३० पर्यंत पृथ्वीवरील काम करणाऱ्या वयातील पाच लोकांपैकी एक भारतीय असेल. त्यांच्या श्रमशक्तीचा योग्य वापर करून घेण्यासाठी सरकारला रोजगारनिर्मितीवर भर देणे आवश्‍यक आहे. याकरिता देशात दरवर्षी गेल्या दशकातील १.२४ कोटी नोकऱ्यांच्या तुलनेत १.६५ कोटी नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. त्यात १.०४ कोटी औपचारिक नोकऱ्या उपलब्ध कराव्या लागतील.

रोजगार निर्मितीसाठी उत्पादन क्षेत्रासह सेवा क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. येणाऱ्या सरकारने उत्पादन क्षेत्रावर भर देण्याची आवश्यकता असून, त्या अनुषंगाने धोरण आखणी आणि अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या स्थितीत लोकसंख्याशास्त्रीय आणि भौगोलिक राजकीय घडामोडींवर लक्ष देणेही महत्त्वाचे ठरणार आहे,’’ असे संस्थेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ ट्रिन्ह गुयेन यांनी म्हटले आहे.

श्रम बल सर्वेक्षणानुसार, शहरी भागातील १५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कामगारांच्या सहभागाचा दर जानेवारी-मार्च २०२४ कालावधीसाठी ५०.२ टक्के होता, तो जानेवारी-मार्च २०२३ मध्ये ४८.५ टक्के होता. महिला श्रमशक्तीचा सहभागही वाढला असून, २०२१ च्या शेवटच्या तिमाहीतील २०.२ टक्क्यांवरून शहरी भागातील महिला कामगार शक्तीता सहभाग दर पुढील दोन कॅलेंडर वर्षांमध्ये अनुक्रमे २२.३ टक्के आणि २५ टक्के झाला.

यात सुधारणा असूनही भारत या परिमाणामध्ये इतर आशियाई देशांच्या मागे आहे. व्हिएतनाममधील महिला श्रमशक्तीचा सहभाग ७५ टक्के आहे, तर चीनमध्ये ते प्रमाण ७१ टक्के आहे. भारत सरकारला या आघाडीवर प्रयत्न करण्याची गरज आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

महिलांचा सहभाग वाढण्याची गरज

भारत या महिलांच्या श्रमशक्ती सहभगामध्ये इतर आशियाई देशांच्या मागे आहे. व्हिएतनाममधील महिला श्रमशक्तीचा सहभाग ७५ टक्के आहे, तर चीनमध्ये ते प्रमाण ७१ टक्के आहे. भारतासाठी २०३० पर्यंत महिला श्रमशक्तीचा सहभाग ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी, मागील दशकातील दरवर्षी निर्माण झालेल्या १.२४ कोटी नोकऱ्यांच्या तुलनेत दरवर्षी १.६५ कोटी नोकऱ्यांची आवश्यकता असेल. ‘एनडीए’च्या दोन कार्यकाळात निर्माण झालेल्या १.१२ कोटी नोकऱ्यांपैकी ६.१ कोटी महिलांसाठी आणि ५.१ कोटी नोकऱ्या पुरुषांसाठी होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

Narayana Murthy: UPSC परीक्षेतून नव्हे तर अशा पद्धतीने करा IAS-IPSची निवड; नारायण मूर्तींनी PM मोदींना केले आवाहन

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

SCROLL FOR NEXT