Aparna Chennapragada Sakal
Personal Finance

Aparna Chennapragada: आणखी एका कंपनीत भारतीय वंशाच्या प्रमुख, अपर्णा चेन्नाप्रगडा सांभाळणार मायक्रोसॉफ्टच्या AI विभागाची धुरा

Aparna Chennapragada: जगातील जवळपास सर्व मोठ्या कंपन्यामध्ये भारतीय वंशाचे सीईओ आहेत.

राहुल शेळके

Aparna Chennapragada: जगातील जवळपास सर्व मोठ्या कंपन्यामध्ये भारतीय वंशाचे सीईओ आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदासाठी भारतीयांना विशेष पसंती दिली जात आहे. उदाहरणार्थ, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला. याशिवाय सॉफ्टवेअर आणि अभियांत्रिकीसह विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या भारतीय वंशाच्या सीईओंची यादी बरीच मोठी आहे.

अपर्णा चेन्नाप्रगडा या Google च्या माजी कार्यकारी अधिकारी होत्या त्यांची आता Microsoft मध्ये कॉर्पोरेट उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे. टेक इंडस्ट्रीमध्ये त्यांना दोन दशकांहून अधिक अनुभव आहे.

IIT मद्रासच्या पदवीधर अपर्णा चेन्नाप्रगडा यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्याशी अनेक महिन्यांत झालेल्या संभाषणात AI चा वापर करून जगभरातील लोक आणि संस्थांना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे त्यांनी कौतुक केले आहे.

अपर्णा चेन्नाप्रगडा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी AI मध्ये काम करण्यास उत्सुक आहे. चेन्नप्रगडा यांनी Google मध्ये 12 वर्षे काम केले आहे, त्यांनी तिथे Google Search, Shopping आणि डिझाइन टीमचे नेतृत्व केले आहे.

त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, चेन्नाप्रगडा यांनी IIT मद्रासमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक, टेक्सास विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी आणि MIT मधून व्यवस्थापन आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

द इन्फॉर्मेशनने अहवाल दिला आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये Google आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील तीव्र स्पर्धेच्या दरम्यान कंपनीने अपर्णा चेन्नाप्रगडा यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT