Indian economy likely to grow at 6.2 percent in 2024, says UN report  Sakal
Personal Finance

GDP: भारताची अर्थव्यवस्था चीनपेक्षा चांगल्या स्थितीत; संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला विश्वास

UN Report On India: संयुक्त राष्ट्रांच्या मते, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगली देशांतर्गत मागणीमुळे भारताचा विकास दर 2024 मध्ये 6.2 टक्के असेल असा अंदाज आहे. WESP 2024 अहवालात म्हटले आहे की दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 2024 मध्ये 5.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

राहुल शेळके

UN Report On India: संयुक्त राष्ट्रांच्या मते, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगल्या देशांतर्गत मागणीमुळे भारताचा विकास दर 2024 मध्ये 6.2 टक्के राहील असा अंदाज आहे.

World Economic Situation and Prospects (WESP) 2024 अहवालात म्हटले आहे की, दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 2024 मध्ये 5.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

उत्पादन आणि सेवा क्षेत्रात चांगली देशांतर्गत मागणी असेल त्यामुळे विकास दर कायम राहील, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, 2023 च्या तुलनेत त्यात थोडीशी घट होणार आहे. अहवालानुसार, 2025 मध्ये भारताचा जीडीपी 6.6 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

हमीद रशीद म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेने या वर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने 6 टक्क्यांच्या वर राहिला आहे.

आमचा अंदाज आहे की 2024 आणि 2025 मध्येही तो कायम राहील. भारतात महागाई जास्त आहे, तरीही भारताला व्याजदर वाढवण्याची गरज नाही.

चीनबद्दल व्यक्त केली चिंता

अहवालानुसार, विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक अधिक झाली आहे. 2023 मध्ये दक्षिण आशियातील, विशेषत: भारतातील गुंतवणूक वाढली आहे.

आर्थिक अस्थिरतेमुळे चीनमधील बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की हवामान-बदलामुळे दक्षिण आशियाला फटका बसू शकतो.

जुलै आणि ऑगस्टमध्ये दुष्काळामुळे भारत, नेपाळ आणि बांगलादेशच्या बहुतेक भागात शेती क्षेत्राचे मोठे नुकसान होते, तर सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे पाकिस्तानमध्ये समस्या निर्माण होतात. या आपत्तींचा जीडीपीमध्ये सर्वात मोठा वाटा असलेल्या देशांमध्ये गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT