Fitch Rating India GDP  Sakal
Personal Finance

India GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेवरील आत्मविश्वास वाढला; फिचने GDP वाढीचा अंदाज 7 टक्क्यांपर्यंत वाढवला

Fitch Rating India GDP Data: रेटिंग एजन्सीने आपल्या ताज्या 'ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूक' मध्ये म्हटले आहे की देशाच्या आर्थिक विकासाने देशांतर्गत मागणी वाढल्याने तिमाही अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

राहुल शेळके

Fitch Rating India GDP Data: भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वेगवान गतीने फिच रेटिंगला आपले मत बदलण्यास भाग पाडले आहे. देशांतर्गत मागणी आणि व्यवसाय आणि ग्राहकांच्या आत्मविश्वासातील सातत्यपूर्ण कल यामुळे 1 एप्रिलपासून पुढील आर्थिक वर्षासाठी (FY2024-25) भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज गुरुवारी Fitch रेटिंगने 7 टक्क्यांपर्यंत वाढवला.

रेटिंग एजन्सीने आपल्या ताज्या 'ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूक' मध्ये म्हटले आहे की देशाच्या आर्थिक विकासाने देशांतर्गत मागणी वाढल्याने तिमाही अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

गुंतवणुकीची वाढ वार्षिक 10.6 टक्क्यांनी वाढली आहे तर खाजगी वापर 3.5 टक्क्यांनी वाढला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी, Fitch रेटिंगने 2024 चा जागतिक GDP वाढीचा अंदाज 0.3 टक्क्यांनी वाढवून 2.4 टक्क्यांवर नेला आहे, कारण नजीकच्या काळातील जागतिक विकासाच्या शक्यता वाढल्या आहेत.

शेवटच्या तिमाहीत वाढीचा वेग कमी होण्याची अपेक्षा

भारतासाठी, फिच रेटिंग्सने म्हटले आहे की सलग तीन तिमाहींमध्ये GDP वाढ 8 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने, आम्ही चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत वाढीचा वेग कमी होण्याची अपेक्षा आहे, याचा अर्थ 24 मध्ये विकास दर 7.8 टक्के असेल.

डिसेंबरमध्ये CPI किरकोळ महागाई 5.7% होती. त्याच वेळी, फेब्रुवारीमध्ये ती 5.1% पर्यंत खाली आली. किरकोळ महागाईच्या चढउतारात भाजीपाला महागाईचा मोठा वाटा आहे. महागाई हळूहळू कमी होत आहे. फिचचा विश्वास आहे की डिसेंबरच्या अखेरीस महागाई RBI च्या 4% च्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल.

RBI ने व्याजदर 6.5% वर स्थिर ठेवले आहेत आणि रिझर्व्ह बँकेचे लक्ष महागाई नियंत्रणावर आहे. Fitch च्या मते, RBI 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत व्याजदरात 50 bps ने कपात करू शकते.

जागतिक जीडीपीमध्ये वाढ

रेटिंग एजन्सीच्या ताज्या अहवालाने चीनच्या आर्थिक विकासाच्या अंदाजात कपात केली आहे. या अंतर्गत, अंदाज 4.6 वरून 4.5 टक्के करण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे मालमत्ता क्षेत्रातील समस्या आणि किंमतीत सातत्याने होत असलेली घसरण.

जागतिक जीडीपी वाढीचा दृष्टीकोन 0.3 टक्क्यांनी वाढून 2.4 टक्के झाला आहे. अमेरिकन आर्थिक अंदाज 2.1 टक्के करण्यात आला आहे, जो पूर्वी 1.2 टक्के होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT