Gold imports Sakal
Personal Finance

Gold Import: सोने पुन्हा महागणार? आयातीत झाली मोठी घट; भारत कोणत्या देशातून सर्वाधिक सोने खरेदी करतो?

राहुल शेळके

Gold Import: जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे चालू आर्थिक वर्षात (2024-25) एप्रिल-जुलै दरम्यान भारताची सोन्याची आयात 4.23 टक्क्यांनी घसरून 12.64 अब्ज डॉलर झाली आहे. सोन्याच्या आयातीचा देशाच्या चालू खात्यातील तूट (CAD) वर परिणाम होतो. गेल्या वर्षी याच कालावधीत सोन्याची आयात 13.2 अब्ज डॉलर होती. भारत स्वित्झर्लंडकडून सर्वाधिक सोने खरेदी करतो. एकूण आयातीत स्वित्झर्लंडचा वाटा सुमारे 40 टक्के आहे.

जुलैमध्ये सोन्याच्या आयातीत 10.65 टक्क्यांची घट झाली आहे

सरकारी आकडेवारीनुसार, आयात केवळ जुलैमध्ये 10.65 टक्क्यांनी घसरून 3.13 अब्ज डॉलर झाली आहे, तर गेल्या वर्षी याच महिन्यात ती 3.5 अब्ज डॉलर होती. जून (-38.66 टक्के) आणि मे (-9.76 टक्के) दरम्यान आयातही कमी झाली आहे. एप्रिलमध्ये आयात वाढून 3.11 अब्ज डॉलर झाली, जी एप्रिल 2023 मध्ये एक अब्ज डॉलर होती.

सोन्याची आयात का कमी झाली?

ज्वेलरी व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चढ्या किमतीमुळे आयात कमी झाली आहे, पण सप्टेंबरपासून त्यात तेजी येईल कारण भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होईल आणि आयात शुल्कात कपातीचा फायदाही मिळेल. केंद्र सरकारने सोन्या आणि चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून सहा टक्के केले आहे.

सोन्याचा भाव काय आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याने 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 300 रुपयांनी वाढून 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताची सोन्याची आयात 30 टक्क्यांनी वाढून 45.54 अब्ज डॉलर झाली आहे.

भारत स्वित्झर्लंडकडून सर्वाधिक सोने खरेदी करतो

स्वित्झर्लंड हा भारतासाठी सोन्याच्या आयातीचा सर्वात मोठा स्रोत आहे, ज्याचा वाटा सुमारे 40 टक्के आहे, त्यानंतर संयुक्त अरब अमिराती (16 टक्क्यांहून अधिक) आणि दक्षिण आफ्रिका (सुमारे 10 टक्के) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: मलिदा गँग, बारामती अन् इंदापूर... हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Latest Maharashtra News Updates : अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात निवडणूकांबाबत चर्चा

Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला तेच शेअर्स कोसळले

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या वेगळ्या नावाने का विकतात? या सणासुदीला नवीन कार घेण्याआधी ही बातमी नक्की वाचा..

SCROLL FOR NEXT