Unemployment Rate India (Marathi News): सांख्यिकी मंत्रालयाच्या नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठीचा बेरोजगारीचा दर 2023 मध्ये 3.1 टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. ही तीन वर्षांतील सर्वात कमी पातळी आहे.
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन (NSSO) ने मंगळवारी जारी केलेल्या श्रमशक्ती सर्वेक्षण अहवालानुसार, देशाचा बेरोजगारीचा दर 2023 मध्ये 3.1 टक्के होता, तर 2022 मध्ये तो 3.6 टक्के आणि 2021 मध्ये 4.2 टक्के होता. (India's unemployment rate dips to 3.1 percent in 2023, lowest in 3 years)
आकडेवारीनुसार, मार्च 2020 मध्ये देशात कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रोजगाराची स्थिती सुधारत आहे. साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. पण केंद्र आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर आर्थिक घडामोडीत वाढ झाल्यामुळे परिस्थिती सुधारली आहे.
2023 मध्ये महिलांमधील बेरोजगारीचा दरही तीन टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. महिला बेरोजगारी 2022 मध्ये 3.3 टक्के आणि 2021 मध्ये 3.4 टक्के होती. त्याचप्रमाणे 2022 मध्ये पुरुषांच्या बेरोजगारीचा आकडा 3.7 टक्के आणि 2021 मध्ये 4.5 टक्के होता, परंतु गेल्या वर्षी तो 3.2 टक्क्यांवर आला.
2023 मध्ये शहरी भागातील बेरोजगारीचा एकूण दरही घसरला आणि तो 5.2 टक्क्यांवर आला. 2022 मध्ये शहरी बेरोजगारीचा दर 5.7 टक्के होता, तर 2021 मध्ये तो 6.5 टक्के होता. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 2022 मध्ये 2.8 टक्के आणि 2021 मध्ये 3.3 टक्के होता तो गेल्या वर्षी 2.4 टक्क्यांवर आला.
बेरोजगारी कमी होत असल्याचा दावा सरकार करत आहे. पण काँग्रेस पक्ष बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांवर सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशात दावा केला की, देशातील बेरोजगारी सध्या गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक आहे.
यामागे नोटाबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी आणि काही भांडवलदारांसाठी धोरणे बनवणे ही कारणे असल्याचा राहुल यांचा युक्तिवाद होता. राहुल गांधी यांनी तर असा दावा केला की, भारतातील बेरोजगारीचे खरे चित्र शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश आणि भूतानपेक्षा वाईट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.