Invest in these schemes for your daughter on National Girl Child Day; A big fund will be created  Sakal
Personal Finance

राष्ट्रीय बालिका दिनी तुमच्या मुलीच्या नावे 'या' योजनांमध्ये करा गुंतवणूक; तयार होईल मोठा फंड

National Girl Child Day: आज राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) आहे. दरवर्षी 24 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि समाजातील मुलींबद्दलचा भेदभाव दूर करून त्यांना सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे.

राहुल शेळके

National Girl Child Day: आज राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) आहे. दरवर्षी 24 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि समाजातील मुलींबद्दलचा भेदभाव दूर करून त्यांना सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे.

जर तुम्हीही मुलीचे पालक असाल तर आजच राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तुमच्या मुलीच्या नावावर अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.

सुकन्या समृद्धी योजना

सगळ्यात आधी नाव येते ते म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेचे. ही योजना भारत सरकार विशेषतः मुलींसाठी चालवते. या योजनेत 15 वर्ष सतत गुंतवणूक करावी लागते आणि ती 21 वर्षांनी मॅच्युअर होते. ज्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात.(Sukanya Samriddhi Yojana)

सुकन्या समृद्धीमध्ये वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सध्या त्यावर 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

तुम्ही सध्याच्या व्याजदरानुसार गणना केल्यास, तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटीनंतर त्याचे 69 लाख 27 हजार 578 रुपये मिळतील. जर तुम्ही 5,000 रुपये दरमहा दराने वार्षिक 60,000 रुपये गुंतवले तर 21 वर्षांनंतर 27 लाख 71 हजार 031 रुपये मिळतील.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र

सुकन्या समृद्धी योजनेनंतर नाव येते महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे, यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलींसाठी, त्यांचे पालक खाते उघडू शकतात. ही एक ठेव योजना आहे ज्यामध्ये 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते.

या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख गुंतवले जाऊ शकतात. योजना दोन वर्षांनी मॅच्युअर होते. जर तुम्ही या योजनेत 2 लाख गुंतवले तर तुम्हाला दोन वर्षांनी 2 लाख 32 हजार 044 रुपये मिळू शकतात. (Mahila Samman Savings Certificate)

पब्लिक प्रोविडंट फंड

पब्लिक प्रोविडंट फंड (Public Provident Fund) ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. जर तुमची मुलगी अल्पवयीन असेल, तर पालक तिच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत 7.1 टक्के दराने व्याज मिळते.

या योजनेतही वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही योजना 15 वर्षांनी मॅच्युअर होते. तुम्ही ही योजना 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये आणखी वाढवू शकता. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर वार्षिक 1.5 लाख गुंतवल्यास, 15 वर्षांनंतर त्याचे 40 लाख 68 हजार 209 रुपये मिळतील. जर खाते 5 वर्षांसाठी वाढवले तर 20 वर्षांनी तुम्हाला 66 लाख 58 हजार 288 रुपये मिळतील.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT