Investment Tips early retirement plan Sakal
Personal Finance

Investment Tips: वयाच्या 40 व्या वर्षी निवृत्त व्हा! बँकेत असतील 1 कोटी, 15x15x15 आहे श्रीमंत बनण्याचा फॉर्म्युला

Investment Tips: तुम्हालाही 15 वर्षांनी निवृत्त व्हायचे असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला उपयोगी पडू शकतो.

राहुल शेळके

Investment Tips: सध्या फक्त 25 वर्ष वय आहे, आता मजा करण्याची वेळ आहे. नंतर बचत करण्याचा विचार करू. बचतीबाबत बहुतांश तरुणांचे असेच उत्तर असते. पण त्यांनी समजून घ्यायला हवं की जबाबदारी वाढली की खर्चही वाढतो. त्यामुळे वेळेत बचत करणे अधिक कठीण होते.

पण असे काही तरुण आहेत जे करिअरच्या सुरुवातीपासून म्हणजेच पहिल्या नोकरीपासून बचतीवर लक्ष केंद्रित करतात. इतकेच नाही तर काही लोक वयाच्या 40, 45 आणि 50 व्या वर्षी सेवानिवृत्तीचे नियोजन करू लागतात.

हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पहिल्या नोकरीपासून बचत करायला सुरुवात करता. तुम्हालाही 15 वर्षांनी निवृत्त व्हायचे असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला उपयोगी पडू शकतो.

चला जाणून घेऊया असा कोणता फॉर्म्युला आहे, जो 15 वर्षात कोणालाही करोडपती बनवतो. 15x15x15 या सोप्या फॉर्म्युल्याने तुम्ही फक्त 15 वर्षात एक कोटी रुपये उभे करू शकता. त्याचवेळी यातून 30 वर्षात 10 कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात.

जर तुम्ही घर, गाडी, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न किंवा तुमच्या निवृत्तीचे नियोजन करत असाल तर या सूत्राने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता.

गुंतवणुकीसाठी बचत करणे आवश्यक

परंतु कोणतेही आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूक करावी लागते आणि ती सातत्याने करावी लागते, 15x15x15 हे सूत्र म्युच्युअल फंडांच्या संदर्भात आहे.

आर्थिक सल्लागार गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपीची शिफारस करतात. कारण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. कोणत्याही वयोगटातील लोक म्युच्युअल फंडात SIP करू शकतात.

15x15x15 सूत्र काय आहे? त्यात तीन 15 आहेत, पहिले 15 गुंतवणुकीची रक्कम ठरवतात. म्हणजेच दर महिन्याला 15,000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर, दुसरे 15 म्हणजे ही गुंतवणूक 15 वर्षे सतत चालू ठेवावी लागेल. तर तिसरे 15 म्हणजे त्या गुंतवणुकीवर वार्षिक 15 टक्के व्याज मिळेल.

हा फॉर्म्युला कसा काम करतो?

15x15x15 फॉर्म्युला वापरून केवळ 15 वर्षांत करोडपती कसे बनू शकता. यासाठी तुम्हाला 15 वर्षे म्युच्युअल फंडात दरमहा 15 हजार रुपये गुंतवावे लागतील आणि या गुंतवणुकीवर 15 टक्के व्याज मिळणे गरजेचे आहे.

त्यानंतर 15 वर्षात गुंतवणूकदाराला एकूण 1,00,27,601 रुपये (एक कोटीपेक्षा जास्त) मिळतील. त्याच वेळी, गुंतवणूकदाराला 27 लाख रुपये जमा करावे लागतील, ज्यावर 73 लाख रुपयांचे व्याज मिळेल.

जर तुम्ही 15x15x15 फॉर्म्युला अंतर्गत वयाच्या 20 व्या वर्षापासून दरमहा 15 हजार रुपये गुंतवले तर तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी करोडपती व्हाल.

जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी सुरुवात केली तर तुम्ही 40 व्या वर्षी करोडपती व्हाल. म्हणजेच वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही या पैशातून घर, कार आणि इतर स्वप्ने पूर्ण करू शकता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT