Share Market Today Sakal
Personal Finance

Share Market Today: आज शेअर बाजारात तेजी कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

राहुल शेळके

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. गुरुवारच्या सुस्तीनंतर बेंचमार्कने 12 जुलैला नवा विक्रमी उच्चांक गाठला. बाजाराच्या शेवटी सेन्सेक्स 622.00 अंकांनी अर्थात 0.78 टक्क्यांनी वाढून 80,519.34 वर बंद झाला. निफ्टी 186.20 अंकांनी म्हणजेच 0.77 टक्क्यांनी वाढून 24,502.20 वर दिसला.

आठवडाभरात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी 0.5 टक्क्यांहून अधिक वाढले. कमजोर जागतिक संकेत असूनही भारतीय बेंचमार्क उच्च पातळीवर उघडले. सत्र पुढे जात असताना निफ्टीने पहिल्यांदाच 24,500 ची लेव्हल पार केली. तर निफ्टी इंट्राडेमध्ये 24,600 लेव्हल जवळ पोहोचला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गेल्या काही दिवसांत निफ्टीमध्ये कंसोलिडेशन दिसून आल्याचे मोतीलाल ओस्वालचे सिद्धार्थ खेमका म्हणाले. यानंतर निफ्टीने आयटी हेवीवेटच्या नेतृत्वाखाली 24500 च्या वर नवीन उच्चांक गाठण्यासाठी चांगली रिकव्हरी दाखवली.

निर्देशांक 196 अंकांच्या (0.8%) वाढीसह 24512 वर बंद झाला. आयटी, ऑईल अँड गॅस आणि बँकिंग सेक्टर्समधील खरेदीमुळे बहुतेक सेक्टर्स हिरव्या रंगात बंद झाले. टीसीएसने अपेक्षित निकाल दिल्यानंतर आयटीने नवीन रॅली पाहिली आणि शेअर 4% वाढला.

आठवडाभरात प्रॉफिट-बुकिंग पाहिल्यानंतर, आयटी कंपनी टीसीएसच्या पहिल्या तिमाहीच्या निकालांच्या सकारात्मक सुरुवातीमुळे निफ्टीने बाजाराचा कल बदलला. खेमका म्हणाले की, चांगल्या त्रैमासिक निकालाच्या अपेक्षा, दर कपातीची अपेक्षा आणि प्री-बजेट रॅलीच्या पाठिंब्यावर ही तेजी कायम राहण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

चालू आठवड्यात आयटी क्षेत्रावर फोकस करणे अपेक्षित आहे कारण इतर मोठ्या आयटी कंपन्या निकाल जाहीर करतील असे सिद्धार्थ खेमका यांचे म्हणणे आहे. सोमवारी, बाजार भारताच्या महागाईच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया देईल, जरी ही आकडेवारी बाजारानंतर जाहीर केली जाईल.

या आठवड्यात, मुख्यतः जियो फायनान्शियल, एचडीएफसी लाइफ, एशियन पेंट्स, एलटीआय माइंडट्री, इन्फोसिस, हॅवेल्स, विप्रो, जेएसडब्ल्यू स्टील, पेटीएम इत्यादींचे निकाल येतील. याशिवाय जागतिक स्तरावर गुंतवणूकदार चीनचे Q2GDP आकडे, यूएस कोर रिटेल विक्री डेटा आणि ईसीबी व्याजदर निर्णयावर लक्ष ठेवतील.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टीसीएस (TCS)

  • विप्रो (WIPRO)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • इन्फोसिस (INFY)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • मारुती (MARUTI)

  • टायटन (TITAN)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT