Passive Funds Sakal
Personal Finance

Passive Funds : पॅसिव्ह फंडाकडे गुंतवणूकदारांचा ओढा - गुरजितसिंग कालरा

Passive funds include index funds and ETF : पॅसिव्ह फंडाचे इंडेक्स फंड आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) हे पर्याय गुंतवणूकदारांना शेअर बाजारामध्ये प्रवेश करण्याचा एक सोपा आणि कमी खर्चिक मार्ग प्रदान करतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा आता पॅसिव्ह फंडामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. यातील सुलभता आणि चांगला परतावा त्यांना आकर्षित करत आहे, अशी माहिती डीएसपी म्युच्युअल फंडाच्या पॅसिव्ह फंड व्यवसायाचे प्रमुख गुरजितसिंग कालरा यांनी दिली.

पॅसिव्ह फंडाचे इंडेक्स फंड आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) हे पर्याय गुंतवणूकदारांना शेअर बाजारामध्ये प्रवेश करण्याचा एक सोपा आणि कमी खर्चिक मार्ग प्रदान करतात. यात शेअर निवडीचे आव्हान गुंतवणूकदारांसमोर नसते. पॅसिव्ह फंड पारदर्शक नियमांचे पालन करत गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणुकीची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात, त्यामुळे छोट्या गुंतवणूकदार मोठ्या संख्येने पॅसिव्ह फंडांची निवड करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या देशात गेल्या तीन ते चार वर्षांत पॅसिव्ह फंडातील मालमत्तेचे प्रमाण त्याआधीच्या पाच ते सहा टक्क्यांवरून आता १६ ते १७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. पॅसिव्ह फंडाच्या व्यवस्थापनाखालील एकूण गुंतवणूक मालमत्तेत (एयूएम) गेल्या तीन वर्षांत तब्बल १८२ टक्के वाढ होऊन ती ९.५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. येत्या २०३० पर्यंत भारतीय म्युच्युअल फंड उद्योग दुपटीने वाढून १०० लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

यात पॅसिव्ह फंडातील गुंतवणुकीचे योगदान अधिक असण्याची अपेक्षा आहे. विशेषतः नवे गुंतवणूकदार या गुंतवणूक प्रकारांमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा अंदाज आहे, असेही कालरा यांनी स्पष्ट केले. डीएसपी म्युच्युअल फंडाकडील पॅसिव्ह फंडातील व्यवस्थापनाखालील मालमत्ता ९.५ हजार कोटी रुपये आहे.

डीएसपी फंडाने २०१७ मध्ये दाखल केलेला पॅसिव्ह फंड प्रकारातील इक्वल वेटेज इंडेक्स फंड तब्बल दहा पटीने वाढला आहे. कंपनीने २०१८ मध्ये लिक्विड ईटीएफ फंड सुरू केला. सध्या दोन लिक्वीड ईटीएफ योजना असलेले डीएसपी हे एकमेव फंड घराणे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यातील बाजारपेठ दोन लाख कोटींची

पुण्यातील म्युच्युअल फंडाची बाजारपेठ दोन लाख कोटी रुपयांची असून, यात पॅसिव्ह फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता नऊ हजार कोटींची आहे. डीएसपी फंडाच्या पॅसिव्ह फंडातील मालमत्ता ५०० कोटींची आहे. यात छोट्या गुंतवणूकदारांची संख्या उल्लेखनीय आहे, असे गुरजितसिंग कालरा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT