IPO sakal
Personal Finance

IPO investment : मॅनकाइंड फार्मा ‘लंबी रेस का घोडा’

मॅनकाइंड फार्मा लि.चा आयपीओ २५ ते २७ एप्रिल दरम्यान येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मॅनकाइंड फार्मा लि.चा आयपीओ २५ ते २७ एप्रिल दरम्यान येत आहे. पूर्णपणे ऑफर फॉर सेल पद्धतीने या इश्‍युची विक्री होणार असून, त्यातून मिळणारी संपूर्ण रक्कम प्रवर्तक (७९ टक्क्यांवरून ७६.५ टक्के हिस्सा खाली येईल) व आधीचे गुंतवणूकदार यांना मिळणार आहे. इश्‍युसाठीचा किंमतपट्टा १०२६-१०८० रुपये असून, किमान १३ शेअर (रु. १४,०४०) व त्या पटीत अर्ज करता येईल.

कंपनीची ओळख

कदाचित सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कंपनीचे नाव अपरिचित वाटत असेल; पण म्हणतात ना, की ‘कंपनी ही तिच्या ब्रँड किंवा उत्पादनामुळे ओळखली गेली, तरच तिचे यश आहे. व्हॅसलीन, सर्फ, रिन, डोमेक्स, क्लोजअप पेस्ट आपल्याला माहिती असते, मात्र ही उत्पादने निर्माण करणारी कंपनी हिंदुस्थान युनिलीव्हर आहे, हे मोजक्या लोकांनाच माहित असेल. याचाच संदर्भ घेऊन सांगायचे झाले, तर मॅनफोर्स कंडोम (३० टक्के बाजारहिस्सा), प्रेगा न्यूज(८० टक्के हिस्सा), गॅस-ओ-फास्ट असे प्रसिद्ध ब्रँड विकणारी कंपनी म्हणजेच मॅनकाइंड फार्मा कंपनी लि.

कंपनीची व्याप्ती

देशांतर्गत ९७ टक्के विक्री असणारी ही चौथ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. ११,००० वैद्यकीय प्रतिनिधींची (Medical Representatives) तगडी फौज, देशात २५ उत्पादन प्रकल्प, संशोधन आणि विकास विभागामध्ये काम करणारे ६०० शास्त्रज्ञ, ३६ ब्रँडस, देशातील सुमारे ८० टक्के डॉक्टर कंपनीच्या उत्पादनांची शिफारस करतात, यावरून कंपनीची एकूण व्याप्ती लक्षात येईल.

आर्थिक लेखाजोखा

मागील तीन वर्षांत (२०२०-२०२२) कंपनीची विक्री ५,९७५ कोटींवरून ७,९७७ कोटी रुपये झाली आहे, तर निव्वळ नफा १,०५६ कोटींवरून १,४५२ कोटी रुपये इतका वाढला. यावरून कंपनीची एकूण आर्थिक स्थिती उत्तमच आहे, हे स्पष्ट दिसून येते.

इश्‍यूचे मूल्यांकन

कंपनीचा सर्व पातळींवरून आढावा घ्यायचा झाला, तर आर्थिक बाजू, बाजारातील स्थान, ट्रॅक रेकॉर्ड आदी बाबींवर प्रगती उत्तमच आहे. सेकंडरी बाजारात बरेच दिवस सुस्त असणारा फार्मा सेक्टर सध्या वरच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. याशिवाय मागील सहा महिने जागतिक बाजार थोडे तणावातून जात असताना ज्या फार्मा कंपन्या देशांतर्गत औषध विक्री जास्त करत आहेत, त्यांना साहजिकच अधिक महत्त्व आले आहे,

या निकषांमध्ये मॅनकाइंड तंतोतंत बसते ही जमेची बाजू आहे. परंतु, इश्‍यू किंमतीचा तुलनात्मक विचार करावयाचा झाल्यास जसे, की सेकंडरी बाजारात स्थिरस्थावर असलेल्या इतर कंपन्या सन फार्मा, सिप्ला, झायडस यांच्या पी/ई रेशोचा (२७-२९) सरासरी विचार करावयाचा झाला, तर कंपनीने निर्धारित केलेली किंमत वाजवीपेक्षा अधिक वाटते.

अंदाजे पी/ई रेशो ३२च्या आसपास येतो; तसेच यातून जमा होणारी थोडीही रक्कम कंपनीला मिळणार नाही, अशावेळी गुंतवणूकदारांसाठी ‘ऑन द टेबल’ फार मोठे मार्जिन ठेवले आहे, असे वाटत नाही. याशिवाय एक सूचक दिशादर्शक म्हणून चालू ‘ग्रे मार्केट प्रीमियम’चा विचार केला, तर सध्या तो प्रती शेअर रु. ६० ते ८०/-(रु.१०८०/ वर ५ ते ७ टक्के) दिसत आहे. हा प्रीमियम फारसा आकर्षक नाही. यामुळे सर्व बाजूंनी विचार करावयाचा झाला, तर अर्ज करण्यास हरकत नाही; पण आयपीओमध्ये शेअर मिळाले नाहीत, तर भविष्यात खरेदीसाठी पुरेशा संधी मिळू शकतील.

‘लंबी रेस का घोडा’

तात्पर्य, मॅनकाइंड फार्मा ही दीर्घकालावधीसाठी चालणारी संधी आहे. कंपनीने सर्व आघाड्यांवर अशीच वाटचाल चालू ठेवली, तर दीर्घ कालावधीमध्ये ती नक्कीच ‘लंबी रेस का घोडा’ ठरू शकेल, त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी संयमाने, कंपनीच्या प्रगतीवर लक्ष ठेवून शेअर खरेदी करत राहणे रास्त ठरेल.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT