वी एल इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडचा (VL Infraprojects Limited) आयपीओ आजपासून अर्थात 23 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे आणि 25 जुलै रोजी बंद होईल. या बुक बिल्ट इश्यूद्वारे 18.52 कोटी उभारण्याची कंपनीची योजना आहे.
हा 44.1 लाख शेअर्सचा पूर्णपणे फ्रेश इश्यू आहे. व्ही एल इन्फ्राप्रोजेक्ट्स आयपीओचा प्राइस बँड 39-42 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. एका अर्जासह किमान लॉट साईज 3000 शेअर्सची आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक रक्कम 1 लाख 26 हजार रुपये आहे.
श्री राजगोपाल रेड्डी अन्नम रेड्डी, श्रीमती मायधिली राजगोपाल रेड्डी आणि श्री नागेश्वर राव रेपुरी हे कंपनीचे प्रमोटर्स आहेत. या आयपीओमधून मिळणारे पैसे खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरले जातील.
बीलाइन कॅपिटल ऍडवायझर्स प्राइवेट लिमिटेड हे आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. तर मार्केट मेकर स्प्रेड एक्स सिक्युरिटीज आहे.
कंपनी वॉटर सप्लाय आणि वेस्ट वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सच्या अंमलबजावणीमध्ये गुंतलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पाईप्सची खरेदी आणि त्यांची ठेवण, जोडणी आणि बॅकवर्ड इंटिग्रेशनसह कमीशनिंगचाही समावेश आहे. कमिशनिंगमध्ये सिव्हिल वर्क, पंपिंग स्टेशन आणि इलेक्ट्रोची स्थापना यासारख्या सर्व संबंधित सिव्हिल इंजिनीअरिंग कामांचा समावेश आहे. नदीतून घरापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी यांत्रिक उपकरणे (पंपिंग मशीन) ही कामेही त्यांच्या अंतर्गत येतात.
2014 साली स्थापन झालेल्या व्ही.एल. इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिंचन क्षेत्रात विविध सरकारी प्रकल्पांचे नियोजन, बांधकाम आणि कार्यान्वित करण्याची ऑफर देते. ही कंपनी गुजरात सरकारने AA श्रेणीची मान्यताप्राप्त कंत्राटदार आहे, तिच्याकडे कर्नाटक राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचा नागरी/विद्युत कंत्राटदार परवाना आहे, तेलंगणा सरकारमध्ये एका विशेष वर्गात नोंदणीकृत आहे आणि मध्य प्रदेश सरकारने कंत्राटदार म्हणून मान्यता दिली आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.