Israel Hamas War Nestle says it has temporarily shut down a production plant in Israel  Sakal
Personal Finance

Israel Hamas War: इस्राइल हमास युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या कंपनीने इस्राइलमधील व्यवसाय बंद केला

Israel Hamas War: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अनेक मोठ्या कंपन्यांवर होऊ लागला आहे.

राहुल शेळके

Israel Hamas War: इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम अनेक मोठ्या कंपन्यांवर होऊ लागला आहे. चॉकलेटपासून हेल्थ ड्रिंक्स आणि इतर उत्पादने बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी नेस्लेने इस्राइलमधील आपला व्यवसाय बंद केला आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युद्धाची परिस्थिती पाहता आम्ही इस्राइलमध्ये चालवलेले आमचे उत्पादन प्रकल्प तात्पुरते बंद करत आहोत.

नेस्लेने म्हटले आहे की खबरदारी म्हणून, त्यांनी इस्राइलमधील त्यांचा एक प्लांट तात्पुरता बंद केला आहे. हमासने या महिन्याच्या सुरुवातीला इस्राइलवर अचानक केलेल्या हल्ल्यानंतर अनेक जागतिक कंपन्यांनी देशातील कामकाज बंद करण्यासारखे निर्णय घेतले आहेत.

नेस्लेचे सीईओ मार्क श्नाइडर यांनी या निर्णयाची माहिती देताना म्हटले आहे की, इस्राइल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान आमचे संपूर्ण लक्ष आमचे सहकारी आणि कर्मचारी सुरक्षित ठेवण्यावर आहे. आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतली आहे आणि व्यवसायाच्या वाढीबाबत यावेळी कोणतेही भाष्य करता येणार नाही.

इस्राइल-हमास युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंनी सुमारे 4,000 लोकांना आपले प्राण गमवावे लागले असून हजारो लोक जखमी झाले आहेत. हे युद्ध 14 दिवसांपासून सुरू आहे आणि तूर्तास तरी ते थांबेल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत नेस्लेने आपला प्लांट तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SAKAL Sting Operation : ‘ट्रॅव्‍हल्‍स’कडून प्रवाशांच्‍या खिशावर डल्ला; ऐन दिवाळीत अवास्‍तव भाडे आकारणी

IND A vs AUS A: साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल शतकाच्या उंबरठ्यावर: भारताचे दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला दमदार प्रत्युत्तर

Arvind Sawant: शायना एनसींवर खरंच आक्षेपार्ह टीका केली का?; अरविंद सावंत म्हणतात, हिंदीत...

IND vs NZ, 3rd Test: जडेजाच्या ५ अन् वॉशिंग्टनच्या ४ विकेट्स; पहिल्याच दिवशी किवींचा डाव गडगडला, आता भारताच्या फलंदाजांची कसोटी

Latest Marathi News Updates: अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना निवेदन

SCROLL FOR NEXT