Aditya L1 Budget Sakal
Personal Finance

Aditya L1 Budget: सौर मोहिमेसाठी नासाला लागले होते 12 हजार कोटी; भारताच्या 'आदित्य एल-1'चं बजेट किती?

Aditya L1 Budget: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य' उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

राहुल शेळके

Aditya L1 Budget: चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर एका आठवड्यानंतर इस्रोने सौर मिशनच्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण केली आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपयांचे बजेट खर्च करण्यात आले, पण सौर मिशन पाठवण्यासाठी किती पैसे खर्च केले जात आहेत आणि या मिशनमध्ये इस्रो काय शोधणार आहे? जाणून घेऊया

ISRO ने स्पष्ट केले आहे की 2 सप्टेंबर रोजी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-L1 मिशन लाँच करण्यास तयार आहेत. या मोहिमेमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य' उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

इस्रोने सांगितले की PSLV-C57/Aditya-L1 मिशन आदित्य-L1 या सूर्याचा अभ्यास करणारी अंतराळ मोहीम आज सकाळी 11:50 वाजता प्रक्षेपित होणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटर येथून याचे प्रक्षेपण केले जाईल.

आदित्य एल-1 मिशनचे बजेट किती आहे?

आदित्य L1 मोहीम ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (ISRO) मोठा प्रकल्प आहे. हे सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरील थराचा अभ्यास करेल. इंडिया टाइम्स आणि हिंदुस्तान टाईम्सच्या मते, मिशनचे बजेट सुमारे 400 कोटी रुपये आहे. अहवालानुसार, या पैशाचा वापर अंतराळयानाची रचना, विकास, प्रक्षेपण आणि ऑपरेशनसाठी करण्यात आला आहे.

आदित्य-L1 सूर्यावर काय करेल?

PSLV-C57 रॉकेट आदित्य L1 उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रक्षेपित करेल. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये L1 बिंदू आहे. याला हॅलो ऑर्बिट म्हणतात. आदित्य L1 तेथे स्थापित केले जाईल.

या मोहिमेतून सूर्याविषयी महत्त्वाची माहिती मिळणार आहे. सूर्याविषयी अनेक अज्ञात रहस्ये उलगडतील अशी अपेक्षा आहे. तुम्हाला सूर्याच्या विविध थरांची माहिती मिळेल. आदित्य एल-1 चे आयुष्य फक्त पाच वर्षांचे असेल.

15 लाख किलोमीटरचा प्रवास करेल

सौर वादळ आणि इतर घटनांची माहिती मिळेल. चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले मिशन असेल. काही फेऱ्या केल्यानंतर, 15 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ते L-1 पॉइंटवर पोहोचेल. या बिंदूभोवती प्रदक्षिणा घालताना आदित्य-एल1 सूर्याच्या बाहेरील थराची माहिती देईल.

इस्रोने आपल्या प्रत्येक मोहिमेत नवे विक्रम केले आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारताने कमी बजेटमध्ये सौर मोहिमेची योजना आखली आहे. आदित्य मिशनचा खर्च 400 कोटी रुपये आहे. सूर्य मोहिमेवर नासाने 12,300 कोटी रुपये खर्च केले. याचा अर्थ इस्रो हा देश पुन्हा एकदा नवा विक्रम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT