Income Tax Return esakal
Personal Finance

ITR Filing 2023: वेळेवर ITR दाखल करणाऱ्यांनाही भरावा लागेल 5,000 रुपये दंड, कारण...

Income Tax Refund Date 2023: मुदतीपर्यंत आयटीआर दाखल न करणाऱ्यांना आता दंडासह आयटीआर भरावा लागेल

राहुल शेळके

Income Tax Refund Date 2023: आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. या मुदतीपर्यंत आयटीआर दाखल न करणाऱ्यांना आता दंडासह आयटीआर भरावा लागेल, हे सर्वांना माहीत आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का की ITR भरल्यानंतर तुम्ही त्याची पडताळणी केली नाही, तर वेळेवर ITR फाईल करूनही तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही ITR दाखल केल्यानंतर अजून ITR पडताळणी केले नसेल, तर तुम्ही ते लवकरात लवकर करावी.

वेळेवर पडताळणी न केल्यास, दंड आकारला जाईल

करदात्यांनी त्यांचा आयटीआर दाखल करण्यासोबतच त्याची पडताळणीही करणेही महत्त्वाचे आहे. पण कधी कधी काही कारणामुळे ते आपण करत नाही.

अशा परिस्थितीत ITR पडताळण्याची वेळ निघून जाईल आणि तुम्हाला नंतर दंड भरावा लागेल. ITR दाखल केल्यानंतर, तुम्हाला त्याच्या पडताळणीसाठी 30 दिवस मिळतात. या कालावधीत तुम्ही ITR ची पडताळणी न केल्यास तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

पडताळणीशिवाय परतावा मिळणार नाही

जर तुम्हाला आयटीआरमध्ये काही परतावा मिळत असेल, तर पडताळणीशिवाय तुम्हाला तेही मिळणार नाही. त्यामुळे आयटीआर भरण्यासोबतच त्याची पडताळणीही खूप महत्त्वाची आहे.

आयटीआर दाखल केल्यानंतर, करदात्यांना त्यांच्या पडताळणीसाठी 120 दिवसांचा कालावधी मिळतो. मात्र आता तो कमी करण्यात आले आहे. आता आयटीआर पडताळण्यासाठी करदात्यांना फक्त 30 दिवस मिळतात.

ITR पडताळणी कशी करावी?

आयकर विवरणपत्र पडताळण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक खाते, डीमॅट खाते, नेट बँकिंग असे अनेक पर्याय मिळतात, ज्याद्वारे तुम्ही काही मिनिटांत ITR पडताळणी सहज करू शकता.

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुमच्याकडे तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. या नंबरवर तुम्हाला एक OTP पाठवला जातो, तो सबमिट करताच पडताळणी पूर्ण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT