ITR Filing Sakal
Personal Finance

ITR Filing: पगार कमी किंवा जास्त असला तरी फाइल करा ITR; आहेत मोठे फायदे, अनेक गोष्टी होतील सोप्या

तुमची मिळकत नॉन-टॅक्सेबल श्रेणीत येत असली तरी, तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.

राहुल शेळके

ITR Filing: आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. दरम्यान, लोकांनी आयटीआर भरण्यास सुरुवात केली आहे. करपात्र उत्पन्नाच्या श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांकडून प्राप्तिकर भरला जातो.

दुसरीकडे, जे लोक करपात्र नसलेल्या उत्पन्नाच्या श्रेणीत येतात त्यांना वाटते की सरकारने त्यांना आयकर न भरण्यासाठी सूट दिली आहे, मग त्यांना आयटीआर भरण्याची काय गरज आहे?

तुमची मिळकत नॉन-टॅक्सेबल श्रेणीत येत असली तरी, तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते जाणून घेऊया.

आयटीआर हा उत्पन्नाचा सर्वात वैध पुरावा

जेव्हा तुम्ही ITR फाइल करता तेव्हा तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळते, जो तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा सर्वात वैध सरकारी पुरावा असतो. उत्पन्नाचा नोंदणीकृत पुरावा मिळाल्यामुळे तुमच्यासाठी क्रेडिट कार्ड, कर्ज इत्यादी घेणे सोपे होते.

ITR फाइलमुळे तुमचा क्रेडिटची स्थिती काय आहे हे समजण्यास मदत होते. याशिवाय, जर आयकर स्लॅब अंतर्गत येत नसलेल्या व्यक्तीकडून टीडीएस कापला असेल तर तो रिटर्न भरून कर परतावा घेऊ शकतो.

नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत

तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असला तरीही, आयकर रिटर्न तुम्हाला यामध्ये खूप मदत करते. कोणत्याही सरकारी विभागाकडून कंत्राट मिळवण्यासाठी आयटीआर देखील उपयुक्त आहे.

तुम्ही आयकर रिटर्न मॅन्युअली फाइल केल्यास, त्याची पावती नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जाते. यामुळे तो तुमचा पत्ता पुरावा म्हणूनही स्वीकारला जातो. अशा प्रकारे, आयटीआर प्रमाणपत्र देखील तुमचा पत्ता पुरावा बनते.

व्हिसा मिळण्यासाठी उपयुक्त

जेव्हा तुम्ही देशाबाहेर दुसऱ्या देशात जाता तेव्हा प्रवास करण्यापूर्वी व्हिसा आवश्यक असतो. व्हिसासाठी अर्ज करताना इन्कम टॅक्स रिटर्न मागितले जाते.

सहसा व्हिसा अधिकारी तुमच्याकडून 3 ते 5 वर्षांचा आयटीआर मागू शकतात. तुम्ही ज्या देशाला भेट देऊ इच्छिता त्या देशातील अधिकारी तुमची आर्थिक स्थिती ITR द्वारे तपासतात.

शेअर बाजारातील नुकसान

जर तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर इथेही आयटीआर उपयोगी पडू शकतो. जर तुम्हाला शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातून काही तोटा सहन करावा लागत असेल तर तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो.

यासाठी तुम्हाला आयकराने निर्धारित केलेल्या अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. यानंतर, पुढील वर्षात भांडवली नफ्यात नुकसान दाखवून तुम्ही कर सवलतीचा लाभ मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT