ITR Filing Deadline 2024 Sakal
Personal Finance

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची संधी; रिटर्न न भरल्यास काय परिणाम होणार?

राहुल शेळके

ITR Filing Deadline 2024: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची आज शेवटची संधी आहे. आयकर विभागाने कर भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी 30 जुलै रोजी सांगितले की, आतापर्यंत 6 कोटींहून अधिक करदात्यांनी रिटर्न भरले आहेत. जर तुम्ही विवरणपत्र भरले नसेल तर तुम्ही हे काम आजच पूर्ण करा.

31 जुलैपर्यंत रिटर्न भरले नाही तर काय होणार?

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. जर कोणत्याही करदात्याने या तारखेपर्यंत विवरणपत्र भरले नाही तर तो 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू शकतो. याला विलंबित आयकर रिटर्न म्हणतात. यासाठी त्याला दंड भरावा लागणार आहे.

याशिवाय कराच्या रकमेवर व्याजही भरावे लागणार आहे. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 234F मध्ये विलंबित रिटर्नचे स्पष्टीकरण दिले आहे. याशिवाय कर भरल्यास त्यावर दरमहा 1 टक्के व्याजही भरावे लागेल.

किती दंड भरावा लागणार?

कलम 234F नुसार, विलंबित रिटर्न भरण्याचा दंड करदात्यांच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित आहे. जर करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यांना विलंबित रिटर्न भरण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला 5,000 रुपये दंड भरावा लागेल.

इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही तर काय होईल?

रिटर्न न भरल्यास करदात्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जो करदाता रिटर्न भरत नाही तो चालू मूल्यांकन वर्षाचा तोटा पुढे नेऊ शकणार नाही.

याशिवाय आयकर विभाग त्याच्यावर दंड ठोठावू शकतो. हा दंड कराच्या 50% ते 200% पर्यंत असू शकतो. जास्त उत्पन्न असणाऱ्या प्रकरणांमध्ये, रिटर्न न भरल्यास तुम्हाला न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : शिंदे सरकारचा मोठा निर्णय! पत्रकार आणि वृतपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळांना कॅबिनेटची मंजुरी

Ratan Tata TCS: जागतिक संकटाचं केलं सोनं अन् रतन टाटांची लाडकी टीसीएस नंबर 1 कंपनी बनली! काय होता 'वाय-टू-के' प्रॉब्लेम?

Healthy Lunch: दुपारच्या जेवणात 'दही' खाल्यास दूर होतात पोटासंबधित 'हे' 4 आजार , जाणून घ्या फायदे

PAK vs ENG 1st Test: Harry Brook चे द्विशतक अन् Joe Root २५० पार; इंग्लंडच्या ६७६ + धावा, पाकिस्तानी रडले ना भावा

Ratan Tata Ford : तुम्हाला माहितीये काय रतन टाटा अन् फोर्डच्या अनोख्या बदल्याची कहाणी? जॅग्वार-लँड रोव्हर विकत घेत रचला होता इतिहास

SCROLL FOR NEXT