Jayshree Ullal Sakal
Personal Finance

Jayshree Ullal: कोण आहेत जयश्री उल्लाल? ज्यांनी संपत्तीच्या बाबतीत सुंदर पिचाईंनाही टाकलं मागे

जयश्री उल्लाल यांचा फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत सेल्फ-मेड महिलांच्या यादीत समावेश

राहुल शेळके

Jayshree Ullal: भारतीय वंशाचे सुंदर पिचाई, सत्या नाडेला यांची यशोगाथा सर्वांना प्रेरणा देते. पण आज आम्ही तुम्हाला एका भारतीय वंशाच्या महिलेबद्दल सांगणार आहोत, जिने संपत्तीच्या बाबतीत मोठ्या अब्जाधीशांनाही मागे टाकले आहे.

जयश्री व्ही उल्लाल या फोर्ब्सच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिलांच्या यादीत समाविष्ट असलेल्या चार महिलांपैकी एक आहेत. जयश्री व्ही उल्लाल या Arista Networks चे CEO आणि अध्यक्ष आहेत.

जयश्री 2018 पासून Arista नेटवर्कचे नेतृत्व करत आहेत. जून 2014 मध्ये त्यांनी ऐतिहासिक आणि यशस्वी IPO आणून कंपनीला अब्ज डॉलर्सचा फायदा मिळवून देण्याचे श्रेयही त्यांना जाते.

कंपनीचे सुरुवातीला कोणतेही उत्पन्न नसताना आणि फक्त 50 कर्मचारी असताना त्यांनी कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेले. जयश्री व्ही उल्लाल या चार महिलांपैकी एक आहेत ज्यांचा फोर्ब्सच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत सेल्फ-मेड महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

फोर्ब्सच्या मते, जयश्री यांची संपत्ती 2.5 अब्ज डॉलर आहे. CA Knowledge नुसार, Alphabet चे CEO सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती 1.31 अब्ज डॉलर आहे आणि Microsoft चे CEO सत्या नडेला यांची एकूण संपत्ती 420 दशलक्ष डॉलर असल्याचा अंदाज आहे. पिचाई आणि नडेला यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जयश्री उल्लाल यांची संपत्ती खूप जास्त आहे.

उल्लाल यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरीमधून झाले. त्यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आणि नंतर सांता क्लारा विद्यापीठात अभियांत्रिकी व्यवस्थापनाचा अभ्यास पूर्ण केला.

जयश्री यांनी AMD, Fairchild Semiconductor आणि Ungerman Bas सारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. क्रेसेंडो कम्युनिकेशन्समध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी IBM आणि Hitachi साठी त्यांनी सेमीकंडक्टर चिप्सचे डिझाइन बनवले होते, जे नंतर Cisco Systems ने विकत घेतले.

2008 मध्ये, त्यांनी अँडी बेचटोलशेम आणि डेव्हिड चेरिटन यांच्या सहकार्याने स्वतःचा उपक्रम सुरू केला. 2014 मध्ये, जयश्री यांनी त्यांच्या कंपनीत IPO गुंतवणूकदार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांच्या नावे अनेक पुरस्कार

जयश्री व्ही उल्लाल यांना 2015 मध्ये E&Y चा उद्योजक ऑफ द इयर, 2018 मध्ये बॅरन्स वर्ल्डचा सर्वोत्कृष्ट सीईओ आणि 2019 मध्ये फॉर्च्युनचे टॉप 20 बिझनेस पर्सन यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

Amit Shah : छत्रपतींच्या गडसंवर्धनासाठी दोन हजार कोटींची तरतूद...अमित शहा : उमरखेड येथील प्रचारसभेत काँग्रेसवर साधला निशाणा

Suryakumar Yadav: प्रतिष्ठेची टोपी! सूर्यानं खाली पडलेली इंडियाची कॅप उचलून केलेल्या कृतीनं जिंकली मनं, Video Viral

SCROLL FOR NEXT