Jet Airways Founder Naresh Goyal appeal to court for bail over money laundering case ED  Sakal
Personal Finance

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Naresh Goyal: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले 74 वर्षीय गोयल यांनी जामीनासाठी विनंती केली आहे.

राहुल शेळके

Naresh Goyal: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले 74 वर्षीय गोयल यांनी जामीनासाठी विनंती केली आहे. गोयल यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ते आणि त्यांची पत्नी दोघेही कॅन्सरशी झुंज देत आहेत.

पत्नीला कॅन्सर झाला असून ती शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी पत्नीसोबत राहण्याची परवानगी द्यावी. न्यायमूर्ती एनजे जमादार यांचे खंडपीठ आता 6 मे रोजी निकाल देणार आहे.

या खटल्यात गोयल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी न्यायमूर्ती जामदार यांना सांगितले की, त्यांच्या अशिलावर गंभीर आरोप असले तरी ते मानवतेच्या दृष्टिकोनातून जामीन मागत आहेत. ते म्हणाले की, त्यांची पत्नी अनिता गोयल कॅन्सरने ग्रस्त आहेत.

साळवे यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मत आहे की त्यांच्याकडे फक्त काही महिने शिल्लक आहेत. त्यांचा आजार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

त्यांच्या याचिकेत असेही म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत गोयल यांना त्यांच्या पत्नीसोबत राहू न देणे हे मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. "त्यांच्या आयुष्याच्या शेवटी, जेव्हा ते दोघेही जीवघेण्या परिस्थितीशी झुंज देत आहेत, तेव्हा ते (गोयल आणि त्यांची पत्नी) एकमेकांना आधार देण्यास पात्र आहेत," असे याचिकेत म्हटले आहे.

गोयल यांनी त्यांच्या याचिकेत असेही म्हटले आहे की त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या वैद्यकीय परिस्थितीमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे आणि मानसशास्त्रीय अहवालानुसार ते गंभीर नैराश्याने ग्रस्त आहेत. “अहवालांनुसार, गोयल गंभीरपणे नैराश्यात आहेत आणि भविष्याबद्दल घाबरले आहेत, त्यांना आत्महत्येचे विचार येत आहेत,” असे याचिकेत म्हटले आहे.

साळवे यांनी सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना सांगितले की श्री गोयल त्यांची पत्नी या दोघांनाही भावनिक आधाराची गरज आहे. साळवे म्हणाले की, मानवतेच्या दृष्टिकोनातून न्यायालयाने नरेश गोयल यांचा पत्नीसोबत एक ते तीन महिने राहण्याचा जामीन अर्ज स्वीकारावा. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी याला विरोध केला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोयल यांना सप्टेंबर 2023 मध्ये कॅनरा बँकेने जेट एअरवेजला कर्ज म्हणून दिलेल्या 538.62 कोटी रुपयांची मनी लाँड्रिंग आणि हेराफेरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केल्यानंतर गोयल यांची पत्नी अनिता गोयल यांना नोव्हेंबर 2023 मध्ये अटक करण्यात आली होती.

अनिता यांना अटकेच्या दिवशी तिचे वय आणि वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. परंतु विशेष न्यायालयाने नरेश गोयल यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार दिले जात असल्याचे कारण देत त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT