रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी २०२३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठी घोषणा केली आहे. अंबानी यांनी कंपनीची जिओ एअर फायबर सेवा जाहीर केली आहे. १९ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर याची सुरुवात होणार आहे. या सेवेच्या माध्यमातून ५जी नेटवर्क आणि वायरलेस तंत्रज्ञानाच्या मदतीने घरोघरी आणि कार्यालयांमध्ये वायरलेस ब्रॉडबँड सेवेचा लाभ कोट्यवधी नवीन युजर्सना मिळणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ एअर फायबर सेवेद्वारे कंपनीचा प्रयत्न २० कोटी घरे आणि कार्यालयांपर्यंत पोहोचण्याचा असेल. दररोज दीड लाख कनेक्शन सहजपणे बसवता येतील. तसेच या सेवेमुळे हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या दिशेने मोठी क्रांती होणार आहे. वायरलेस कनेक्टिव्हिटीमुळे केबलद्वारे कनेक्शन घेण्याची गरज संपेल.
जिओची एअर फायबर सेवा काय आहे?
जिओ एअर फायबर सेवेमुळे युजर्सना ब्रॉडबँड प्रमाणे हाय-स्पीड इंटरेनटचा लाभ केबल किवा वायर्स शिवाय मिळेल. यूजर्सना थेट जिओ एअर फायबर डिव्हाइस प्लग-इन करावे लागेल आणि युजर्स वायफाय हॉटस्पॉट प्रमाणे अनेक डिव्हाइसेसवर वेगवान ५जी इंटरनेट स्पीड चा लाभ घेऊ शकतील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.