Jio Financial forms joint venture with BlackRock: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स समूहाची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बाजारात धमाका करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस मालमत्ता व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसायात उतरणार आहे.
यासाठी Jio Financial Services ने जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापक कंपनी BlackRock सोबत हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये 50:50 भागीदारीसह संयुक्त उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिओ फायनान्शिअलने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनी आणि ब्लॅकरॉक यांच्यात संपत्ती व्यवस्थापन कंपनी आणि ब्रोकरेज फर्म स्थापन करण्याच्या उद्देशाने 50:50 संयुक्त उपक्रम तयार करण्यासाठी करार केला आहे.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने सांगितले की, हा संयुक्त उपक्रम ब्लॅकरॉक इंक सोबतचे संबंध आणखी मजबूत करेल. अमेरिकन गुंतवणूक कंपनी ब्लॅकरॉक ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. याआधी, Jio Financial Services ने 26 जुलै 2023 रोजी देशातील मालमत्ता व्यवस्थापन उद्योगाला बदलण्यासाठी आणि भारतातील गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा विस्तार करण्यासाठी 50:50 JV लाँच करण्याची घोषणा केली होती.
भारतीय शेअर बाजारात काल मोठी घसरण पाहायला मिळाली. यानंतरही, Jio Financial आणि BlackRock यांच्या हातमिळवणीमुळे, कंपनीच्या शेअरची किमत इंट्राडे सत्रादरम्यान 5% पेक्षा जास्त वाढून 371.95 रुपये प्रति शेअरवर पोहोचली. मात्र, दुपारी 2.10 वाजता कंपनीचा शेअर 2.68 टक्क्यांनी म्हणजेच 9.50 रुपयांच्या वाढीसह 363.80 रुपयांवर व्यवहार करत होता.
BlackRock ने भारतीय बाजारापासून जवळपास पाच वर्षे अंतर ठेवले होते. कंपनीला सुमारे 11 लाख कोटी रुपयांची मालमत्ता हाताळण्याचा अनुभव आहे. आता कंपनी भारतात रिलायन्ससोबत काम करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या उपकंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटचे नाव बदलून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस केले आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये लवकरच ट्रेडिंग सुरू होणार आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.